मांडा–टिटवाळ्यात हिंदू एकजुटीचा महासागर; विचारप्रबोधनातून जागृतीचा ठिणगीदार संदेश

टिटवाळा : मांडा–टिटवाळा (पूर्व) परिसरातील विद्यामंदिर शाळेच्या पटांगणावर भरलेल्या हिंदू संमेलनाने सामाजिक जागृती, सांस्कृतिक अभिमान आणि एकजुटीचा प्रभावी संदेश देत परिसरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. विविध क्षेत्रांतील हिंदू समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमाचे स्वरूप एका भव्य सामाजिक चळवळीप्रमाणे उभे राहिले.

या संमेलनात प्रमुख वक्त्या यशोदा पाटील आणि हर्षदा केणे यांनी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीचे नेमके आणि ठोस विश्लेषण करत उपस्थितांचे प्रबोधन केले. समाजात वाढत असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांवर, विशेषतः मुलींना लक्ष्य करून घडणाऱ्या घटनांवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. लव्ह जिहाद आणि लँड जिहाद यांसारख्या संवेदनशील विषयांवर भाष्य करत त्यांनी तरुणींना सजग राहण्याचा स्पष्ट संदेश दिला. भावनांच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नयेत, तसेच पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवत जागरूक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी ठामपणे केले.

वक्त्यांनी हिंदू धर्माची महान परंपरा आणि गौरवशाली इतिहास प्रभावीपणे मांडताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी आणि येसूबाई यांसारख्या पराक्रमी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची उजळणी केली. धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची उदाहरणे देत उपस्थितांमध्ये अभिमानाची ज्वाला पेटवली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राहुल मिश्रा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजातील ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले. हिंदू समाजातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करत संकटात खांद्याला खांदा लावून उभे राहिले, तर समाज अधिक सक्षम आणि सशक्त बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन देवसर यांनी अत्यंत प्रभावी आणि सुरेख पद्धतीने पार पाडले. संपूर्ण संमेलन शिस्तबद्ध, विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. या भव्य संमेलनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता वाढवणे, एकजूट दृढ करणे आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याचा ठोस प्रयत्न करण्यात आला. मांडा–टिटवाळ्यातील हे संमेलन केवळ एक कार्यक्रम न राहता, समाजमनाला दिशा देणारी आणि एकात्मतेची नवी ठिणगी पेटवणारी चळवळ ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *