कामाचे पैसे मागितले म्हणून   टिटवाळ्यात   परप्रांतीयांकडून आई-मुलावर हल्ला; डोळ्याला गंभीर दुखापत, गुन्हा दाखल

टिटवाळा : प्रतिनिधी रितेश कांबळे

 टिटवाळा येथील मोरया नगर परिसरात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामावरून झालेला वाद चिघळत जाऊन मराठी युवक आणि त्याच्या आईवर परप्रांतीय इसमांकडून झालेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत योगेश शिंदे याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून आरोपीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्याची स्थानिक पोलिस स्टेशनला  नोंद असून, गटार पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने वाद निर्माण होऊन . पुढे हा वाद हातघाईवर येत परप्रांतीय इसमांनी योगेश शिंदे व त्याच्या आईला बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मेस्त्री काम करणारे शिंदे यांनी परप्रांतीय रहिवासी असलेल्या मनीष बाथम यांच्या चाळीमध्ये केलेल्या गटाराचे कामाचे पैसे मागण्याकरिता गेलो असता त्या गोष्टीचा राग येवुन मला मनिष  बाथम, हर्ष  बाथम, सुनिल बाथम, यांनी शिवागाळी दमदाटी करून धक्का बुक्की करन बाजुला पडलेला बांबु उचलुन मेस्त्री शिंदे यांच्या डाव्या डोळ्यावर मारुन व ठोश्या बुक्यांनी मारहाण केली . तसेच भांडण सोडवायला गेलेल्या  शिंदे  यांच्या आईलाही  ठोश्याबुक्क्रयानी पाठीवर व पोटावर, हातातवर मारून शिवीगाळी दमदाटी केली यानंतर जखमी अवस्थेत पीडितांनी तात्काळ मदत मागितली. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना  ॲड. अविनाश पांडुरंग शिळकंदे यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, महाराष्ट्रात परप्रांतीयांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक जण बेकायदेशीरपणे वास्तव्यास राहून अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच  (विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सैनिक)  दिलीप पुनमचंद राठोड यांनीही तीव्र निषेध नोंदवत म्हटले की, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने मराठी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. या प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे असून दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध व्यक्त करत भविष्यात अशा घटना घडल्यास अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रशासनाने बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *