चालक दिनानिमित्त वाहनचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान

टिटवाळा  : अजय शेलार 

चालक दिनानिमित्त गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा वाहतूक शाखा, कल्याण तालुका यांच्या वतीने विविध वाहनचालकांचा गुलाबाचे फूल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जड व अवजड वाहने, कार तसेच दुचाकी वाहन चालकांना चालक दिनाच्या शुभेच्छा देत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

वाहतूक शाखेच्या वतीने रस्त्यावर वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन न करणे, वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे तसेच स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे याबाबत वाहनचालकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. चालकांची भूमिका ही रस्ते वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने प्रत्येक चालकाने जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मा. श्री. आसिफ बेग, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, ठाणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस हवालदार रावसाहेब केदार, पोलीस शिपाई निलेश मोरे, पोलीस शिपाई अमित पवार आणि महिला पोलीस शिपाई वैशाली ढेरे यांनी वाहनचालकांना गुलाबाचे फूल देऊन चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासोबतच वाहनचालकांशी आपुलकीचा संवाद साधत त्यांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *