जागतिक महिला दिनानिमित्त अनाथ मुली व विधवा महिलांना शिलाई मशीन व अन्नधान्य वाटप

कल्याण : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी ठाणे विभाग, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान आणि वे ट्र्यु लाईफ चॅरिटेबल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथ मुली व गरजू विधवा महिलांना मोफत शिलाई मशीन तसेच अन्नधान्य राशनचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.

भाजपा ठाणे विभाग सचिव, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रदेश सदस्य व ठाणे विभाग संयोजक ॲड.  शिल्पा राजू राम यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कल्याण परिसरातील अनेक अनाथ मुली व विधवा महिलांना मोफत शिलाई मशीन आणि अन्नधान्याचे किट खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार कपिल पाटील यांनी वे ट्र्यु लाईफ चॅरिटेबल सोसायटीचे कार्य तसेच डॉ. राजू राम आणि ॲड. शिल्पा राम दांपत्याने पक्षवाढीसाठी व नागरिकांच्या न्यायहक्कासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. समाजहिताच्या उपक्रमांमुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळत असल्याचे त्यांनी नमूद करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला केडीएमसीमधील भाजपा गटनेते नगरसेवक वरुण पाटील, कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, विभाग सचिव दिपक भंडारी, दिपक ब्रिद, भिवंडी सरचिटणीस राम माळी, कल्याण पूर्व शहर उपाध्यक्ष सुनील शेलार, ॲड. प्रल्हाद भिलारे, समाजसेवक दिपक वानखेडे, हेमलता कदम, समाजसेविका रुबन गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होणार असून समाजात महिला सक्षमीकरणाचा संदेशही देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *