मानव एकता दिवसानिमित्त मुंबईसह अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन

सेवा आणि आध्यात्मिक समरसतेचा एक पावन उत्सव

कल्याण : दिव्य आध्यात्मिक चेतनेला साकार करण्यासाठी संत निरंकारी मिशनतर्फे बाबा गुरबचन सिंहजी यांच्या पावन स्मृतीनिमित्त ‘मानव एकता दिवस’ २४ एप्रिल रोजी श्रद्धा, समर्पण आणि प्रेममय वातावरणात आयोजित केला जाणार आहे, जो संपूर्ण मानवजातीला एकत्व, सेवा आणि सद्भाव यांचा अमूल्य संदेश देईल.

सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात दिल्लीतील बुराडी येथे निरंकारी सरोवरासमोर ग्राउंड क्र. २ वर भव्य आणि दिव्य सत्संगाचे आयोजन करण्यात येईल, जिथे श्रद्धाळू भक्त प्रेम, भक्ती आणि आध्यात्मिकतेच्या अद्वितीय संगमाचा अनुभव घेतील. हा पावन प्रसंग केवळ एक आयोजन नसून, आत्मिक जागृतीचा उत्सव असेल, जो प्रत्येक हृदयाला ईश्वरीय एकत्वाच्या अनुभूतीशी जोडून आंतरिक शांती आणि समाधानाचा अनुभव करून देईल.

यासोबतच, देश-विदेशातील विविध शाखांमध्येही श्रद्धाळू भक्त एकत्र येऊन या दिव्य सत्संगाला सखोल आत्मिक भावाने साकार करतील. मुंबई महानगर प्रदेशामध्ये मानव एकता दिवसाच्या निमित्ताने जवळपास 35 ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले आहे. या पावन संगमाच्या माध्यमातून प्रत्येक हृदय प्रेम, शांती आणि बंधुत्वाच्या प्रकाशाने उजळून निघेल तसेच मानवतेच्या एकात्मतेचा संदेश जगभर प्रसारित होईल.

दिल्ली येथील मुख्य आयोजन स्थळी सकाळी ८ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर अत्यंत श्रद्धा, समर्पण आणि सेवा-भावाने आयोजित केले जाईल. त्याचप्रमाणे संत निरंकारी सत्संग भवन चेंबूर, संत निरंकारी सत्संग डोंबिवली आणि भिवंडी येथेही  २४ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *