कल्याण : नाशिक येथील जातीवाद पासरविणाऱ्यां विरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत कारवाई कारण्याच्या मागणीसाठी कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यापासून हा मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तहसीलदार कार्यालयात रिपाइंच्या वतीने निवेदन देण्यात आले.
त्याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारच्या बार्टी मार्फत वीदेशी उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी घातलेल्या जाचक अटी तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पवई येथील जयभीम नगर झोपडपट्टीवर करण्यात आलेल्या नियमबाह्य कारवाईचा देखील यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. या झोपडपट्टी वासीयांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव डोळस, कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड. संग्राम मोरे, कल्याण शहर अध्यक्ष संतोष जाधव, कल्याण शहर महिला अध्यक्ष अनीता सुतार, गणेश कांबळे, नरेंद्र मोरे, माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, संदीप जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने देखील नाशिक घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष राम बनसोडे, कल्याण डोंबिवली अध्यक्ष भैरवनाथ वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.














Leave a Reply