टिटवाळा रेल्वे अपघात प्रसंगी रेल्वे आरपीएफ आणि आयओडब्ल्यू स्टाफ वर गुन्हे दाखल करण्याची रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

कल्याण :  गुरुवारी पंजाब मेल खाली रेल्वे रूळ ओलांडताना एका प्रवाशाचा टिटवाळा रेल्वे स्थानकात दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे तब्बल संध्याकाळी ऐन पिक अवरला पाऊण तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि याचा फटका कसारा मार्गांवरील चाकरमणी आणि इतर प्रवाशांना झाला या घटनेचा तीव्र संताप कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सरचिटणीस व डिआरयूसीसी सभासद श्याम उबाळे यांनी रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला केला असून निष्काळजी स्थानिक रेल्वे आरपीएफ आणि आयओडब्ल्यू स्टाफ यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी एका ई-मेल तक्रारी द्वारे केलेय.
रेल्वे रूळ ओलांडून अपघाताचे प्रमाण खडवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकात वाढल्यामुळे हे रोखण्या करिता संघटनेतर्फे दोन रेल्वे रुळामध्ये लोखंडी फेनसिन्ग (जाळी ) उभारा अशी मागणी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे करीत असल्याचे श्याम उबाळे यांनी नमूद केले आहे. मुंब्रा लोकल ट्रेन अपघात प्रसंगी ही रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करुन ठाणे पल्याड कसारा आणि कर्जत मार्गावर अपघात रोखण्या बाबत उपाय योजना सुचविण्यात आल्या मात्र नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने यावर असंवेदनशीलता दाखविली.
टिटवाळा खडवली येथे रेल्वे रूळ फेनसिन्ग कामे होत नाही तो पर्यंत स्थानिक तैनात आरपीएफ स्टाफ यांनी गस्त घालण्याची विनंती केली व रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने करण्यात येतेय. टिटवाळा येथे झालेला अपघात पासून रेल्वे आरपीएफ चौकी आणि आयओडब्ल्यू कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे आणि तैनात कर्मचारी आपल्या धुंदीत असतात त्यामुळे अशा निगर गट्ट आणि असंवेदनशील कर्मचाऱ्यांवर जो पर्यंत कारवाई होणार नाही अथवा त्यांच्या पोटाला चिमटा बसणार नाही तो पर्यंत त्यांची ” चलता है “हि वृत्ती जाणार नाही असें आपल्या निवदनात श्याम उबाळे यांनी म्हटले आहे.
टिटवाळा येथील अपघातामुळे लोकल गाड्या पाऊन -एक तास खोळंबल्या. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि भाजपा सरकार रेल्वे आधुनिकी करणा बाबत कितीही गमजा मारत असल्या तरीही लोकल का उभी आहे याची माहिती लोकल मधील प्रवाशांना देण्याची उदघोषणा होत नाही इतकेही तंत्रज्ञान विकसित नाही काय असा सवाल श्याम उबाळे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *