टिटवाळा , वार्ताहर : कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बनेली कोकणनगर परिसरात उधारीवर सिगरेट न दिल्याच्या वादातून एका तरुणाने दुकानदारावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दुकानदारासह अन्य एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीकांत यादव आणि रमाकांत यादव हे दुकानदार या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत .हल्ला करणारऱ्याचे नाव हसन शेख (वय 19) असे आहे . हा प्रकार 21 ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडला. आरोपी शेख हा नेहमीप्रमाणे परिसरातील दुकानात गेला. त्याने उधारीवर सिगरेट मागितली. मात्र दुकानदारांनी “उधारी वाढली आहे, पैसे दिल्याशिवाय सिगरेट मिळणार नाही” असे सांगितल्याने तीक्ष्ण वाद सुरू झाला. वाद झटापटीत बदलला आणि आरोपीने सोबत असलेला चाकू काढून दोघांवर वार केले. सभोवती उपस्थित असलेल्या शेजाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला नसता, हल्ला अधिक गंभीर व जीवघेणा ठरला असता, असे स्थानिकांनी सांगितले. या हल्ल्यात जखमी झालेल्या घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपीविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

परिसरात गुन्हेगारी वाढल्याची स्थानिकांची नाराजी
कोकणनगर परिसरात मागील काही महिन्यांपासून नशेच्या आहारी गेलेले तरुण व गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळक्यांचे प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची नाराजी आहे. बेकायदेशीर असलेल्या पान टपऱ्यावर सहज मिळणारे अंमली पदार्थ आणि ते पुरवणारी टोळी या भागांत सक्रीय असल्याचे देखील येथील नागरिकांनी सांगितले तसेच परिसरात पोलिसांचा पुरेसा व ठोस बंदोबस्त नसल्याने अशा घटना वाढत असल्याचे नागरिकांचे मत आहे. थे नियमित गस्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर अशा घटना थांबणार नाहीत,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
गैर कृत्य करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही -वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी

याबाबत टिटवाळा पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांना विचारले असताना ” घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीला अटक केली आहे . तसेच त्या भागासह अन्य ठिकाणी देखील गस्त वाढवण्यात आली आहे . तसेच अश्या पद्धतीने जर अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांना तत्काळ पोलिसांनी संपर्क करावा . तसेच अश्या पद्धतीचे गैर कृत्य करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही असे सांगितले. सदर घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा . पोलिस निरीक्षक नितीन मुदगुन व मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक करत आहेत .














Leave a Reply