नांदेडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती: गर्भवती तरुणीसह प्रियकराची निर्घृण हत्या

Whatsapp image 2025 08 28 at 9.12.55 pm (1)

नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे २६ ऑगस्ट रोजी हृदयद्रावक घटना घडली. विवाहित आणि दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या तरुणीसह तिच्या प्रियकराची घरच्यांच्या रोषाचा बळी ठरून हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी संतापून तिला व प्रियकराला गावी नेले. त्यानंतर करकळा शिवारातील विहिरीत दोघांना फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. तरुणीचा मृतदेह विहिरीत तर प्रियकराचा मृतदेह विहिरीजवळ सापडला.

या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, काका आणि आजोबा यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील आणि उमरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी पाहणी केली.

तरुणी विवाहित असून तिला दोन महिन्यांचा गर्भ होता. तिच्यासह पोटातील बाळाचा आणि प्रियकराचा अशा अमानुष पद्धतीने अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची तुलना ‘सैराट’ चित्रपटातील कथानकाशी होत असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *