जिजाऊ UPSC/MPSC अकॅडमीच्या विद्यार्थ्याची यशस्वी कामगिरी
पालघर / ठाणे : जिजाऊ मोफत UPSC/MPSC अकॅडमी झडपोली येथील विद्यार्थी, विशाल भरसट याची कनिष्ठ अभियंता (पर्यटन आणि संस्कृती विभाग)पदी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्च स्तरांतून कौतुक होत आहे . तर या आधी देखील त्याची भूमी अभिलेख विभागामध्ये “सर्व्हेयर” म्हणून तर जिल्हा परिषद रायगड मधे सिव्हिल इंजिनीअरिंग असिस्टंट म्हणून देखील निवड झाली होती. एकाच तीन तीन चांगल्या पदांसाठी त्याची निवड झाल्याने जिजाऊ मोफत UPSC/MPSC अकॅडमीविषयी आता जनमानसात पूर्वीपेक्षाही अधिक विश्वासहर्ता निर्माण झाली आहे.
विशाल भरसट याचे शालेय शिक्षण श्रीमती मालिनी संघवी विद्यामंदिर मलवाडा,विक्रमगड या ठिकाणी तर महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल कॉलेज ,दादर झाले असून त्याने दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ,ऐरोली येथे पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्याचे वडील एस.टी .महामंडळ मधे नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर पुणे येथे पुढील तयारीसाठी दीड वर्ष तो त्या ठिकाणी असताना कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. अश्यावेळी पुण्याला महिन्याला १०-१२ हजार रुपये होणारा खर्च त्याला परवडणारा नव्हता . मधला वेळ घरी वाया गेल्याने अभ्यासाची लिंक तुटली या काळात एमपीएससी मेन्स परीक्षा उत्तीर्ण होवून मुलाखतीसाठी साठी तो पात्र झाला होता. लॉकडाऊन संपल्यावर जिजाऊ अकॅडमी झडपोली येथे लायब्ररीमधे त्याने प्रवेश घेतला आणि पुन्हा एकदा अभ्यासाची सूरुवात केली.
पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील रामपूर (गावितपाडा) येथील रहिवाशी असलेल्या विशाल याने एमपीएससी परीक्षेमध्ये १ वेळा इंटरव्यूव्ह आणि २ वेळा मेन्स परीक्षा दिलेल्या आहेत परंतु थोड्या मार्काने पोस्ट मिळाली नाही . घरी शेती आहे थोडीफार आणि वडील एकटेच कमावणारे असल्यामुळे परिस्थिती साधी आहे. मात्र जिजाऊच्या अकॅडमीमधे आल्यावर त्याला मोफत लायब्ररी सुविधा मिळाली त्याचबरोबर मोफत मेस मिळाल्याने जेवणाची सोय देखील झाली. यामुळे खर्चाच टेन्शन निघून गेलं यामुळे अभ्यासावर अजून चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित होऊ लागल्याचे विशाल याने बोलताना सांगितले .
२४ तास फ्री लायब्ररी आणि होस्टेलची सुविधा मिळाल्यामुळे दिवसातला जास्तीत जास्त वेळ अभ्यास करणे शक्य झाले . इंटरव्युव्ह साठी आणि इतर जॉब तयारीसाठी लायब्ररी मधल्या मार्गदर्शक असलेल्या तज्ञ शिक्षकांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. जिजाऊ लायब्ररीमधे मोफत पुस्तके उपलब्ध झाली त्याचबरोबर टेस्ट सिरीजचासुद्धा लाभ घेतला.
जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश(अप्पा) सांबरे यांनी नेहमीच अभ्यासासाठी उत्साह वाढवला “संस्थे कडून कोणत्याही प्रकारची मदत लागली तरी सांग, क्लासबुक , सिरीज अशी कोणतीही मदत लागली तर संस्थे कडून घ्या ” अशा शब्दात निलेश सांबरे आणि संस्था नेहमी मदतीसाठी तत्पर राहायचे यामुळेच मला हे यश मिलालायचे विशालने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कोकण विभागातील विविध भागांत एकूण ४५ जिजाऊ मोफत UPSC/MPSC अकॅडमी चालू असून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटा सुखकर होवून त्यांना विविध पदांवर शासकीय स्तरांवर चांगल्या नोकरीच्या संध्या प्राप्त झाल्या आहेत. स्वप्नील माने सारख्या विद्यार्थाने देखील ह्याच जिजाऊ मोफत UPSC/MPSC अकॅडमीचा लाभ घेऊन आयपीएस अधिकारी या पदापर्यंत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि समाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थापक निलेश सांबरे यांच्या चालू असलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल शासकीय स्त्रंवर देखील घेण्यात आली असून विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे.













Leave a Reply