कल्याण : रोशन उबाळे
कल्याण लोकसभा मतदारसंघातील जवळपास ८० हजार मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. त्यांची नावे मतदार यादीतून गायब होती. या प्रकरणी विविध राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. आता मतदार ओळखपत्रे मिळून आल्याने निवडणूक प्रक्रियेविषयी शंका व्यक्त केली जात आहे.शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे पिसवली भागात मिळालेली मतदार ओळखपत्रे खरी असल्यास ती मतदारांना का दिली गेली नाही. कुणी अशा प्रकारे लपवून ठेवून निवडणुकीनंतर एका ठिकाणी फेकून दिली. तसेच ज्या मतदारांची ही ओळखपत्रे त्यांच्या नावाने अन्य कुणी बोगस मतदान केले का? ही मतदार ओळखपत्रे बनावट असल्यास त्यांच्या नावाने मतदान करुन झाल्यावर ती फेकून दिली असावी. या प्रकरणी पोलिसांनी योग्य प्रकारे वस्तुनिष्ठ तपास केल्यास हा प्रकार कुणी केला आहे याचा उलगडा होईल, असं वैशाली दरेकर यांनी म्हटलं.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अशा प्रकारे किती मतदार ओळखपत्रे अन्य कुठे फेकून दिली आहेत का? हे उघड होईल. या प्रकाराची निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली पाहिजे. याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे. तपास करुन कायदेशीर कारवाई करणार मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी याबाबत म्हटलं की, पिसवली गावात मतदार ओळखपत्रे सापडली होती. जवळपास ७०० ओळखपत्रे आहेत. याची माहिती कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना सांगितली. त्यांना पोलीस ठाण्यास बोलावून घेतले. त्यांनी तपासणी केली आहे. ही ओळखपत्रे खरी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अशा प्रकारे किती मतदार ओळखपत्रे अन्य कुठे फेकून दिली आहेत का? हे उघड होईल. या प्रकाराची निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली पाहिजे. याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.
तपास करुन कायदेशीर कारवाई करणार
मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी याबाबत म्हटलं की, पिसवली गावात मतदार ओळखपत्रे सापडली होती. जवळपास ७०० ओळखपत्रे आहेत. याची माहिती कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना सांगितली. त्यांना पोलीस ठाण्यास बोलावून घेतले. त्यांनी तपासणी केली आहे. ही ओळखपत्रे खरी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.














Leave a Reply