राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी सुधाभाऊ आमदारच आहात.. अनिकेत तटकरे

Whatsapp image 2025 04 26 at 1.18.51 pm

माझ्या वाटेला येईल ते सुधाकर घारे यांना दिले जाईल.. तटकरे
मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

कर्जत,प्रतिनिधी, नितिन पारधी

कर्जत विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा निसटता पराभव झाला असला तरी सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार वाटत आहेत.त्याचवेळी तुम्ही सत्तेत आहात कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील महायुती सरकार मध्ये 33 टक्के वाटा आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपण सत्तेत आहोत हे ध्यानात ठेवून विकास कामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यातून आपला पक्ष दोन्ही तालुक्यात क्रमांक एकचा पक्ष आहे असे जाहीर विश्वास यावेळी व्यक्त केला.दरम्यान सुनील तटकरे यांच्याकडून अदिती तटकरे आणि माझ्यावर प्रेम आहे तेव्हढे प्रेम सुधाकर घारे यांच्यावर असून माझ्या साठी पक्ष जे देईल ते आधी सुधाकर घारे यांच्यासाठी दिले जाईल असे आश्वासन अनिकेत तटकरे यांनी दिले.
कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने कर्जत येथील पक्ष कार्यालयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. साळोख ग्रामपंचायत माजी सरपंच आवेश जुवारी,जेष्ठ कार्यकर्ते सलाम शेख तसेच मोग्रज ग्रामपंचायत माजी सरपंच अर्जुन सकपाळ यांनी तसेच सालोख ग्रामपंचायत मधील कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.याप्रसंगी विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी निवडून आले नसलेतरी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील जनतेच्या मनातील आमदार आहेत असे आम्ही मानतो.आपण सत्तेमध्ये असून महायुतीच्या सरकार मध्ये आपल्या पक्षाचा 33 टक्के वाटा आहे.नेतेमंडळी एकत्र येतात आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होतो हे मान्य आहे पण सुधाकर घारे आपण आपला राष्ट्रवादी काँगेस पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न पक्षाला जाणीव नक्कीच आहे. प्रभावाच्या विरोधात असलेला हा मतदारसंघ असून माजी आमदार सुरेश लाड यांच्या सोबत असलेले 99 टक्के सहकारी आज सुधाकर घारे यांच्या पाठीशी आहेत हे पक्षावर विश्वास ठेवून आहेत याचा आनंद अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला.पराभव झाला हे मान्य आहे पण झालेला पराभव हा उल्हास नदी मध्ये सोडून द्यावे आणि पुढे कामाला लागावे असे आवाहन करून अदिती तटकरे जिंकल्या याचा आनंद आहे,तसे दुःख तुमच्या पराभवातून झाला हे जाहीरपणे सांगतो.त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता सुधाकर घारे यांना मोठ्या मताधिक्याने आमदार करण्यासाठी कटिबध्द व्हा असे आवाहन अनिकेत तटकरे यांनी केले.स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूक येणार आहेत आणि त्यावेळी पक्ष म्हणून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट आणि मजबूत होईल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते सुधाकर घारे यांनी आपण निवडणूक हरलो पण आजपर्यंत आपल्या पक्षातील एकही कार्यकर्ता पक्षातून अन्य पक्षात गेला नाही.त्याचवेळी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे काम गेली अनेक दिवस सुरू आहे. आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून विकास कामे केली जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व कार्यकर्त्यांचे पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *