कल्याण, दि. : कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने वाहनचोरी प्रकरणात एका सराईत गुन्हेगाराला अटक करत ८० हजार रुपये किमतीची स्कुटी हस्तगत केली आहे. पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांत सुरक्षिततेचा विश्वास बळावला आहे.
१३ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी लोकग्राम सर्कल परिसरातून पियुष मधुकर जाधव (वय २०, रा. अमूल निवास, काटेमानिवली नाका, कल्याण पूर्व) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून TVS कंपनीची एन्ट्रोक स्कुटी (क्रमांक MH-04-LU-3194) हस्तगत करण्यात आली, जी कलम ३०३(२) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात चोरीला गेली होती.
ही यशस्वी कारवाई परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार, कल्याण सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या नियोजनाने पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील, अंमलदार मिलिंद बोरसे, राजेश कापडी, भागवत सौंदाणे, भगवान सांगळे, विलास जरग, नरेंद्र दळवी, दिलीप सोनावळे व प्रदीप गीते यांचे योगदान मोलाचे ठरले. कोळशेवाडी पोलिसांच्या तत्पर आणि परिणामकारक कारवाईमुळे नागरिकांत पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून, गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.














Leave a Reply