“जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फळझाडांच्या वृक्षारोपणाने हरित संदेश”

Whatsapp image 2025 06 05 at 10.04.28 am

कल्याण – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या सदस्यांनी मिळून आपल्या कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

या उपक्रमादरम्यान फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून त्यामध्ये पेरू, फणस, जांभूळ आणि आंबा यासारख्या उपयुक्त झाडांचा समावेश होता. या वृक्षारोपणाचा उद्देश केवळ सौंदर्यवाढ नव्हे तर भविष्यात परिसरात हिरवळ निर्माण करून पर्यावरणाचा समतोल राखणे हा आहे.

कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्वेता शिर्के, कल्याण शहर संघटक गजानन प्रजापती आणि संस्थेच्या सदस्या भारती प्रजापती यांची विशेष उपस्थिती होती. या सर्वांनी स्वतः झाडे लावून जनतेला पर्यावरण जागृतीचा संदेश दिला.

या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्यांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेत झाडांची निगा राखण्याचेही आश्वासन दिले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संस्थेने घेतलेला हा उपक्रम अन्य संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत असून या प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जावेत अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *