या स्नेहसंमेलनाचा मुख्य विषय ‘श्रीराम’ असा होता. या विषयाच्या माध्यमातून श्रीराम हे केवळ धर्माचे प्रतीक नसून जीवनाकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी आहे, हा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला. नामजपातून मिळणारे शारीरिक व मानसिक लाभ, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि आदर्श विचारसरणी यांचा संदेश विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून सहजपणे पोहोचवण्यात गंधर्व गुरुकुल यशस्वी ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात वैदिक मंत्रोच्चारांनी झाली. त्यानंतर गंधर्व गुरुकुलच्या वाटचालीचा संक्षिप्त व मुद्देसूद आढावा मांडण्यात आला. प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित सूत्रसंचालन कार्यक्रमाची एकात्मता अधिक ठळक करत होते. संपूर्ण कार्यक्रमात गायन, हार्मोनियम, कीबोर्ड, भरतनाट्यम, कथ्थक, वेस्टर्न डान्स, बासरी आणि तबला यांचे लाईव्ह परफॉर्मन्स सादर करण्यात आले. या सादरीकरणांना कुशल वादकांची उत्कृष्ट साथ लाभली, ज्यामुळे प्रत्येक सादरीकरण अधिक प्रभावी ठरले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली काटेकोर तयारी, विद्यार्थ्यांनी निर्भयपणे केलेले सादरीकरण आणि संपूर्ण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन यामुळे स्नेहसंमेलनाची उंची अधिक वाढली. मंच, प्रकाशयोजना व ध्वनीव्यवस्था दर्जेदार असल्याने कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि उत्साहाने भरलेला होता. कार्यक्रमादरम्यान चविष्ट अल्पोपहाराचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना आपली कला मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळाली, तर पालकांनीही मुलांच्या प्रगतीचे आणि शिक्षकांच्या मेहनतीचे मनापासून कौतुक केले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ होण्यास या कार्यक्रमाने मोलाची भूमिका बजावली. अनेक पालकांनी हा अनुभव प्रेरणादायी आणि संस्मरणीय असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रमंडळी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षकवृंद, सहकारी, वादक, साउंड आर्टिस्ट, हॉल व कॅटरर्स तसेच पालकांचे आभार मानत गंधर्व गुरुकुलच्या संचालिकेने कार्यक्रमाची सांगता केली. कला, संस्कार आणि एकोप्याचा संदेश देणारे हे स्नेहसंमेलन उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवून गेले.
या कार्यक्रमाला प्रमोद नांदगावकर , वैदेही नांदगावकर , रविंद्र घोडविंदे, पाटील, जोशी, शीला नांदगावकर, सुधा जानविलकर, खिसमतराव, संदीप रेडकर, शीतल रेडकर, नितीन नांदगावकर, भूमी नांदगावकर, डॉ. सचिन सातपुते, सन्नी नागदेव, डॉ. सिद्देश्वर चामनारू, अॅड. विलास भारती, तुषार शिंपी, दामोदर धोरडे महाराज, प्रशांत दीक्षित, विवेकानंद झरे, प्रवीण वाणी, मुकुंद नावकर, अमर धनावडे यांच्यासह अनेक मान्यवर व मित्रमंडळी उपस्थित होत्या. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. मयूर सावर्डेकर, सिद्धी सावर्डेकर, ओमकार लवांदे, प्रशांत सावंत, सुनील गोडांबे, कोमल गायकवाड पाटील, कोमल नागावेकर जाधव, अनंता तरणे, पराग वाणी यांनी नियोजन, मार्गदर्शन व अंमलबजावणी करत कार्यक्रमाला यशाच्या शिखरावर नेले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संपूर्ण स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरले.
















Leave a Reply