श्री चैतन्य शाळेचे नासा स्पर्धेत यश

कल्याण : डोंबिवली येथील श्री चैतन्य शाळेने नासा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.  शाळेचे इयत्ता सातवीतील विद्यार्थी  आदिकेशव कामिला, शौर्य पाटील, सत्यम तिवारी, तर इयत्ता आठवीतील तनय जैस्वाल  यांनी राष्ट्रीय स्तरावरील नासा प्रकल्प स्पर्धेत संपूर्ण भारतामधून तृतीय क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका हेमावती वर्मा यांनी बोलताना सांगितले की, आमच्या शाळेने  नासाच्या स्पर्धेत भाग घेतला होता. राष्ट्रीय स्थरावर अमेरिकेच्या नासाच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस मार्फत आयएसडीसी परिषदेत जगभरातील सुमारे ३० देशातील ८ हजार विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी १६७ विद्यार्थी हे केवळ श्री चैतन्य शाळेतील होते. विशेष म्हणजे या परिक्षदेतील जगातील इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील इतके विद्यार्थी निवडले गेले नाहीत.

नुकतेच अमेरिकेच्या नासाच्या मार्गदर्शनाखाली एनएसएसद्वारे चालवलेल्या जाणाऱ्या स्पेस सेंटीमेंट्स कॉन्टेस्टमधे एकट्या भारतातील २८ हजार विद्यार्थ्यानी भाग घेतला. त्या पैकी महाराष्ट्राच्या डोंबिवलीतिल श्री चैतन्य टेक्नो शाळेने या स्पर्धेत राष्ट्रीय पातळी वर तिसरा क्रंमांक पटकावला आहे. या सर्व विजेत्या स्पर्धकांचे श्री चैतन्य मुंबई झोनचे मॅनेजर सुरेंद्र यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत मुंबई झोन मधून ३०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.  त्या पैकी डोंबिवली येथील ४ विद्यार्थ्यांच्या गटाला तिसरा क्रंमांक मिळाला आहे.  या नासा प्रोग्राम च्या विद्यार्थ्यांना मंगला लक्ष्मण झंकार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *