कल्याण : कुणाल म्हात्रे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील सध्या कार्यरत असलेल्या केंद्र शासनाच्या सीआरएस प्रणाली मध्ये बदल करण्यात आला असल्यामुळे हि प्रणाली कार्यरत ठेवण्याकरिता सध्या थोडा विलंब होत आहे.
सुधारित प्रणाली नुसार एक वर्षापुर्वी नोंदणी न केलेल्या घटनांसाठी कोर्टाच्या आदेशा ऐवजी तहसिलदार यांचे लिखित आदेश आता आवश्यक आहेत. तसेच सीआरएस प्रणाली शिवाय अन्य कोणत्याही मार्गाने बेकायदेशीररित्या जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी करण्यात येऊ नये, अथवा ठेवण्यात येऊ नये असे शासनाचे निर्देश आहेत.
तसेच खाजगी रूग्णालयांनी करावयाची नोंदणी, विविध प्रकारच्या दुरूस्ती तसेच शुल्क आकारणी इत्यादी बाबत महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांना प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील जन्म-मृत्यु विभागाची प्रणाली पुर्ववत होण्यासाठी थोडा अवधी लागण्याची शक्यता असल्याने जन्म-मृत्यू दाखले मिळण्याकरीता थोडा विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याबाबत नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन निबंधक डॉ.दिपा शुक्ल यांनी केले आहे.














Leave a Reply