ठाणे जिल्ह्यातील तरुणवर्ग व शेतकऱ्यांना विविध व्यवसायासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक दहा कोटीचे कर्ज देणार

राजेंद्र पाटील यांचे प्रतिपादन !

मुरबाड दि.६-(बाळासाहेब भालेराव )

ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण व शहरी भागात तरुणवर्ग व शेतकऱ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दहा कोटी रुपये कर्ज देणार असे प्रतिपादन ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मुरबाड बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या बँक आपल्या दारी तसेच खरीप हंगाम पीक वाटप मेळाव्यात केले. यावेळी व्यासपीठावर मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण गोंधळी,बँकेचे संचालक सुभाष पवार, राजेश पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष उल्हास बांगर मुरबाड बाजार समितीचे सभापती लक्ष्मण सरलिंगे ,उपसभापती प्रकाश व्यापारी ,खरेदी विक्री संघाचे चेअरमन किसन गिरा ,मुरबाड तालुकाप्रमुख प्रकाश पवार ,ठाणे जिल्हा शिवसेना सचिव कांतीलाल कंटे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामभाऊ दळवी, उबाठा शिवसेना मुरबाड तालुकाप्रमुख संतोष विशे, पंचायत समिती माजी सदस्य अनिल देसले, यांच्या तालुक्यातील सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन, संचालक ,तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र पाटील यांनी सांगितले की यावर्षी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला निव्वळ नफा. २१५ कोटी रुपये झालेला आहे सदर बॅंकेचं जाळं फार मोठ्या प्रमाणात पसरलेआहे तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचे काम करत आहे म्हणून यापुढे या बँकेद्वारे तरुणवर्ग व शेतकऱ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी बँक दहा कोटींचं कर्ज देणार आहे त्याचबरोबर विविध योजना संदर्भात ज्या काही शेतकरी वर्गाने बँके संदर्भात सूचना केल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करून त्या पुढील काळात सोडवल्या जातील असे शुभ संकेत दिले. तर मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे हे आपल्या भाषणात म्हणाले की खऱ्या अर्थाने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्य फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यात नावाजलेली बँक म्हणून समजली जात आहे, परंतु या बँकेला जर शेतकरीवर्ग घडवायचा असेल तरुणवर्ग व शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे तसेच या बँकेद्वारे मोठमोठे प्रकल्पासाठी उद्योजकांना संधी दिली पाहिजे त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला पाहिजे तरच मुरबाड शेतकरी हा सावरला जाईल मी नेहमी सांगत आलोय की नशिबाला एक तरी सातबारा हवा असे उद्गार आमदार किसन कथोरे यांनी काढले. तर कार्यक्रमाचे निमंत्रक तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण गोंधळी यांनी संपूर्ण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सविस्तर माहिती प्रस्ताविक भाषणात दिली. तसेच बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, बँकेचे संचालक सुभाष पवार, राजेश पाटील, व बँकेचे माजी अध्यक्ष उल्हास बांगर यांनी सुद्धा या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेविषयी ज्या, ज्या सुविधा आहे त्या सुविधांची विशेष माहिती दिली व सर्व शेतकऱ्यांनी तसेच संचालक मंडळ हा नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे विविध प्रकारचे कर्ज विविध प्रकारचे शैक्षणिक कर्ज ही बँक उपलब्ध करून देत आहे तर याचा सर्व शेतकरीवर्ग व तरुणवर्ग यांनी फायदा उठवला पाहिजे असे वरील मान्यवरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *