डोंबिवलीतील रस्त्यामधील खड्डे पालिका आयुक्तांना दिसत नाही का ?

सात दिवसात रस्त्यांमधील खड्डे बुजविले नाही तर आंदोलन

संतप्त रिक्षाचालकांचा उपोषणाचा इशारा

 

डोंबिवली ( शंकर जाधव )

दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडणे डोंबिवलीकरांना नवीन नाही. वास्तविक पावसाळ्याच्या आधी रस्त्याची डागगुजी करणे आवश्यक आहे.मात्र कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेला डोंबिवली शहराचा विसर पडल्याने येथील रस्त्यात खड्डे अद्याप बुजविले नाहीत.खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावर रिक्षा चालक मालक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालिका आयुक्तांना डोंबिवलीतील रस्त्यामधील खड्डे दिसत नाही का ? असा प्रश्न रिक्षाचालकांनी उपस्थित करत उपोषनाच इशारा दिला.

डोंबिवली पश्चिमेकडील ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळील रस्ता, नवापाडा आणि कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदानजवळ रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे.पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन वाहनचालक जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार पालिका प्रशासन असून पावसाळ्याआधी रस्त्याचे काम करणे आवश्यक होते. रस्त्यातील खड्यांमुळे रिक्षाचालकांना मणक्याचा त्रास सुरु झाला आहे.यावर गांभीर्याने लक्ष देत रिक्षा चालक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला. संघटनेचे सचिव भगवान मोरजकर म्हणाले, डोंबिवलीतील रिक्षाचालक किती वर्ष हे सहन करणार ? पालिका आयुक्त, उपायुक्त, पालिका अधिकारी यांना डोंबिवलीतील रस्त्यामधील खड्डे दिसत नाही का ? पालिका प्रशासनाने पावसाळ्यात डोंबिवलीतील रस्त्यांची पाहणी करावी म्हणजे त्यांना रिक्षाचालकांचे अवस्था समजले. येत्या सात दिवसात जर डोंबिवलीतीलरस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर रिक्षाचालक आधी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करू आणि त्यानंतरहि अशी अवस्था दिसली तर मात्र आम्ही आमरण उपोषण करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *