माजी विद्यार्थ्याला शाळेत प्रमुख पाहुणे बोलावलं नी ते गहिवरले
डोंबिवली ( शंकर जाधव ) :
ज्या शाळेत शिकलो, शालेय शिक्षणाबरोबर अनेक क्षेत्राचा अभ्यास केला, आज त्याच शाळेने मला प्रमुख पाहुणे बोलावलं, मला अभिमान आहे कि मराठी माध्यमातून शिक्षण घेतले.डोंबिवली पूर्वेकडील पार्थली शांतीनगर विद्यालयात भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब हे बुधवार 10 तारखेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गहिवरले. शांतीनगर विद्यालय येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग व भाजपा प्रणित डोंबिवली रिक्षा चालक मालक यांच्या संयुक्त विद्यमामाने विद्यार्थ्यांना व्ह्या वाटप करण्यात आले. तसेच इंदिरा चौकात रिक्षाचालकांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप कार्यक्रम पार पडला. शाळेत पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, भाजपा प्रणित रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळेकर, राजू शेख, उपाध्यक्ष रवी जाधव,खजिनदार संतोष अतकरे, सरचिटणीस संजय तिवारी, उपाध्यक्ष जयनाथ यादव, राजेश श्रीवास्तव, संजय शेटे, संजय प्रजापती, नामदेव काळे, कमलापूरकर आळंगे आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधीकारी रोहित पवार आदी उपस्थित होते.
कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे म्हणाले,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार,जिल्हा सरचिटणीस नंदू परब आणि भाजपा वाहतूक सेलचे पदाधिकारी दत्ता माळेकर हे गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप केले जात आहे.शांतीनगर विद्यालयात सर्वसामान्य घरातील विद्यार्थी शिकत असून आज विद्यार्थ्यांना दप्तर आणि वह्या देण्यात आल्या.पूर्वीचा काळ वेगळा होता, आता शिक्षण घेतल्यावरच समाजात मान मिळतो. शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी भाजपा नेहमीच विद्यार्थ्यांना सहकार्य करत असते.यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस परब म्हणाले, मी शाळेत शिकलो आणि घडलो.या शाळेने खूप काही दिले.भाजपातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे याच शाळेत शिकलो. वाहतूक सेलचे पदाधिकारी दत्ता माळेकर म्हणाले, गरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही सदैव मदत करत असतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून नागरिकांना सहकार्य केले जाते.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना शाळेतील शिक्षकांनी सांगणे आवश्यक आहे कि, एका रिक्षात तीन ते चारच विद्यार्थी असावेत.विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना वाहतुकी नियमांचे धडे मिळाले तर भविष्यात वाहतुकीत अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना वाहन चालविताना सांगायला हवे कि हेल्मेट वापरा, सिग्नल तोडू नका, नियमाचे पालन करून ओव्हरटेक करू नका.
उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी
रोहित पवार














Leave a Reply