केडीएमसी शिक्षण विभागाच्या वतीने साक्षरता दिंडीद्वारे जनजागृती

कल्याण : कुणाल म्हात्रे 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आज नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जनजागृती साठी साक्षरता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महापालिकेच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या मान्यता प्राप्त शाळांनी केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत महापालिकेच्या शिक्षण विभागातील आपल्या शाळेच्या जवळपासच्या परिसरात 17 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नवभारत साक्षरता कार्यक्रमाची जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी त्यासाठी योग्य ते बॅनर फलक तसेच घोषवाक्ये यांचा वापर करून आपापल्या परिसरामध्ये रॅलीचे आयोजन केले. जेणेकरून आपल्या शाळेच्या परिसरात एकही असाक्षर रहाणार नाही आणि आढळलेल्या असाक्षारांची लगेच त्याची नोंदणी करून घेण्यात येणार आहे.

साक्षरता दिंडी मध्ये शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी, समग्र शिक्षाचे कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. साक्षरता दिंडीचे आयोजन करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतची योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *