डोंबिवली ( शंकर जाधव ) :
जळगावातील पाथरी मधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांनी ‘भिंतीबाहेरील शाळा’ उपक्रम सुरु केला. याचाच आदर्श घेऊन डोंबिवलीतील एका अशा ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ‘तंत्रज्ञानाची शाळा’ भरू भरू शकते.अगदी तंत्रज्ञानातील सर्वच माहिती दिली जाईल असे नाही पण संगणक व त्यासंदर्भातील माहिती दिली जाईल. तसा प्राथमिक उपक्रम करू शकतो असे डोंबिवलीकर नितीन शेठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रत्यक्ष अनुभव मुले विसरत नाही. बाहेरच जग कसे आहे? वेगवेगळ्या व्यवसायाची ओळख व माहिती मिळावी ही आता काळाची गरज बनली आहे.डिझीटल युगात प्रत्यक्षात तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व त्यातून जगातील व्यवहाराचे ज्ञान मिळावे म्हणून याची माहिती मला जेवढी आहे तेवढी देण्याची इच्छा आहे असे आन्सर कंपूस्टर इन्स्टिटयूटचे मालक सचिन शेठ यांनी सांगितले. याच्या दुसरी शाखा काटई जवळील वैभव नगररी जवळ सुरु झाली. या शाखेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या शाखेचे उदघाटन लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले डोंबिवलीकर सतीश चाफेकर यांच्या हस्ते केले.
यावेळी सतीश चाफेकर म्हणाले, विद्यार्थ्याना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी याकरता संगणक व त्यातून करिअर अशी माहिती मिळावी म्हणून तंत्रज्ञानाचे असे मंदिर असे काळाची गरज आहे. शाळेतील. विद्यार्थ्यांनी अशा मंदिरात यायला हवे व माहिती घेतली पाहिजे असेही चाफेकर यावेळी म्हणाले.














Leave a Reply