भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबिर

डोंबिवली ( शंकर जाधव )

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभा मतदार संघ आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथील भाजपा नगरसेविक रसिका कृष्णा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात सोमवार २३ तारखेपासून आधार कार्ड शिबिर सुरु करण्यात आले आहे. तीन दिवसीय या शिबिराच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याकरता गर्दी केली होती.आज पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आधार नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावत करण्याचा लाभ घेतला. हे शिबिर दिनांक 23 ते 25 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आज लाभ घेतला नाही, त्यांनी मंगळवार २४ व बुधवार २५ असे दोन दिवसात उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष कृष्णा पाटील यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, जुनी डोंबिवली येथे शिबीर भरले असून सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यत शिबीराची वेळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *