टिटवाळा : अजय शेलार
श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम साधत टिटवाळा पश्चिमेकडील वासुंद्री रोड नाजेक असलेल्या गुरुकृपा चाळ या ठिकाणी असलेल्या दुर्गामाता मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. उद्या सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी आयोजित या सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसाद (भंडारा) यांचे भव्य आयोजन या मंदिराचे विश्वस्त रुपेश(दादा) भोईर यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
याप्रसंगी बोलाताना रुपेश भोईर म्हणाले की २०१२ साली या मंदिराची स्थापना झाली . माझी एक मनोकामना दुर्गामातेच्या आशीर्वादाने पूर्णत्वास गेली आणि तेव्हा हे मंदिर बांधण्याचा मी संकल्प केला . मंदिर बांधल्यानंतर दरवर्षी या ठिकाणी महापूजा आणि भंडा-र्याचे आयोजन केले जाते यंदाचे हे १४ वे वर्ष आहे . या मंदिरातील देवीवर केवळ माझीच नाही तर परिसरातील सर्वच दुर्गामाता भक्तांची श्रद्धा असून ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशी येथील ख्याती आहे .या सोहळ्याची सुरुवात सायंकाळी हरिपाठ व भजनांनी होणार असून विविध भजन मंडळांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे. श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ, श्रीराम प्रसादिक भजन मंडळ, संत ज्ञानेश्वर भजन मंडळ तसेच साई आश्रय गुरुमाऊली भजन मंडळ यांच्या सुमधुर गायनातून वातावरणात भक्तीचा गजर घुमणार आहे.
यानंतर विधीवत श्री सत्यनारायणाची पूजा पार पडणार असून सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भोईर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुकृपा चाळ, वासुंदी रोड, मांडा-टिटवाळा (पश्चिम), येथे करण्यात आले असून स्थानिक नागरिकांसह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक उत्साहात पार पडणार आहे. श्री रूपेश (दादा) चंद्रकांत मोईर, सौ. सुमिता रूपेश मोईर, श्री दिनेश चंद्रकांत मोईर व सौ. निलम दिनेश मोईर हे या सोहळ्याचे निमंत्रक आहेत. एकूणच, दुर्गामाता वर्धापन दिनानिमित्त आयोजित हा धार्मिक सोहळा केवळ पूजा किंवा महाप्रसादापुरता मर्यादित नसून समाजातील ऐक्य, श्रद्धा आणि परंपरेचा वारसा जपणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.














Leave a Reply