डेहणे-गुंडे परिसरातील शेतकऱ्यांना ४०० कलमी आंबा रोपांचे वाटप

शहापूर :शहापुर डोळखांब चंद्रकांत देसले

पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढविणे तसेच शेतकऱ्यांना वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने डेहणे-गुंडे सजा परिसरातील शेतकऱ्यांना सुमारे ४०० कलमी आंबा रोपांचे वाटप करण्यात आले.

ग्राम महसूल अधिकारी प्रतीक्षा यादव यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. शेतकऱ्यांनी वितरित करण्यात आलेल्या आंबा रोपांची योग्य पद्धतीने लागवड करून त्यांचे नियमित संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या उपक्रमामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून, भविष्यात आंबा उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. महसूल विभागाच्या या उपक्रमाचे शेतकरी आणि ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *