चंद्रकांत देसले/ शहापूर प्रतिनिधी
ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अंजनीमाता शैक्षणिक व सामाजिक संस्थेने आणखी एक पाऊल उचलत सह्याद्री विद्यालय, टेंभुर्ली येथे सहावे मोफत वाचनालय सुरू केले. संस्थेचे अध्यक्ष तसेच भिनार गावचे पोलीस पाटील हरेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून कै. विश्वनाथ तांबोळी यांच्या स्मरणार्थ कामोठ्याच्या विघ्नहर्ता मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वाचनालयाचे उद्घाटन उद्योजक सचिन तांबोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वाचनालयासाठी त्यांनी उदार आर्थिक मदतही दिली. संस्थेची ही सहावी शाखा असून भविष्यात १०० वाचनालये सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
टेंभुर्ली येथील शिक्षक, पालक तसेच मांजरे गावचे पोलीस पाटील भरत चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे गावात वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव व साकुर्ली गावचे पोलीस पाटील जगदिश भोईर यांनी प्रास्ताविक सादर केले. तर उपाध्यक्ष स्वागत विशे यांनी वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी दीपिका परटोले, किरण जाधव, योगेश बांगर, दीपक देशमुख, प्रमोद पोंढेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते नवनीतजी यशवंतराव यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जयवंत आरज, शाहू भोसले, सुमित पानसांडे, अजय पाटील, संजय पुर, अक्षय सुळे, काशिनाथ चौधरी, हरिश्चंद्र विशे, भरत डोहळे, वसंत चौधरी, सुरेश चौधरी, वैभव विशे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पांडुरंग भेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव जगदिश भोईर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप आरज, सतीश कुलकर्णी, आदिनाथ देशमुख, मुख्याध्यापक देशमुख सर व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष मेहनत
















Leave a Reply