ठाणे आणि उरण येथे 266 निरंकारी भक्तांकडून उत्साहपूर्ण रक्तदान

कल्याण : “मानवतेची सेवा हीच सर्वोच्च भक्ती आहे” सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या दिव्य संदेशाने प्रेरित होऊन, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या दोन रक्तदान शिबिरांमध्ये एकूण 266 निरंकारी भक्तांनी उत्साहाने रक्तदान केले. ही शिबिरे संत निरंकारी सत्संग भवन, वागळे इस्टेट, ठाणे आणि हनुमान कोळीवाडा सत्संग भवन, उरण येथे पार पडली. रक्त संकलन संत निरंकारी ब्लड बँक, विले पार्ले, मुंबई यांनी केले.

संत निरंकारी सत्संग भवन, वागळे इस्टेट, ठाणे (किसन नगर शाखा) येथे आयोजित शिबिरात एकूण 190 युनिट रक्त संकलित करण्यात आले. शिबिराची सुरुवात परमात्मा निरंकाराच्या प्रार्थनेने झाली. या प्रसंगी जम्मू येथून आलेले मिशनचे ब्रह्मज्ञान प्रचारक जगदीश राज तसेच स्थानिक संयोजक सुभाष भोसले उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्रीराम रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी उपस्थित राहून मिशनच्या मानवसेवेच्या कार्याचे कौतुक केले.

हनुमान कोळीवाडा सत्संग भवन, उरण येथे आयोजित रक्तदान शिबिरात 100 जणांनी नोंदणी केली असून त्यापैकी 76 युनिट रक्त संकलित करण्यात आले. हे शिबिर संयोजक दत्ताराम पाटील आणि मुखी अनंत शेनॉय यांच्या उपस्थितीत सुरळीत पार पडले. दोन्ही शिबिरांनी एकता, सेवा आणि भक्तीभावाची सुंदर भावना प्रत्यक्षात उतरवली असून, स्वेच्छा रक्तदानाद्वारे जीव वाचविण्याच्या पवित्र कार्यात मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *