टिटवाळा : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) यांच्या आदेशान्वे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड ,अनिल लाड यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीक्षेपक मापक पथकाने टिटवाळा परिसरात ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची रीडिंग घेण्यास सुरुवात केली आहे. मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनिमर्यादेचे पालन होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करून मोजमाप केले जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्याची नोंद घेऊन नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याने गणेशोत्सव मंडळांनी ध्वनीमर्यादेचे काटेकोर पालन करावे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत जल्लोषासोबत नियमांचेही भान ठेवण्याची जबाबदारी मंडळांवर राहणार आहे.
विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर; ध्वनीक्षेपक मापक पथकाकडून रीडिंगला सुरुवात













Leave a Reply