टिटवाळा : स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या मांडा-टिटवाळा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला टिटवाळा परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेविका उपेक्षा भोईर आणि भाजपचे टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून विद्या मंदिर, मांडा टिटवाळा स्टेशनजवळ हा रोजगार मेळावा पार पडला.
सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात नोकरी मिळवणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत असताना स्थानिक महिलांसाठी रोजगाराच्या संधी त्यांच्या दारातच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. रोजगाराच्या शोधात असलेल्या अनेक महिलांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये तब्बल २५७ महिलांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे अनेक महिलांना रोजगाराची आशा निर्माण झाली असून हा मेळावा त्यांच्या आयुष्यात नवी दिशा देणारा ठरला.
नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला नेहमीच प्राधान्य दिले असून ‘लाडक्या बहिणी’ या संकल्पनेतून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. महिलांनी स्वावलंबी बनून कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत हातभार लावावा आणि समाजात त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या हेतूने अशा प्रकारचे उपक्रम पुढेही आयोजित करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
या रोजगार मेळाव्याला नगरसेविका उपेक्षा शक्तीवान भोईर, भाजपचे मांडा-टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, उपाध्यक्ष अजय मिश्रा, अमोल केदार, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष ब्रिजेश पांडे, सुभाष पिसाळ, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश भोय, वॉर्ड क्रमांक आठचे युवा अध्यक्ष सोपनील पाठारे, महेश घोळपकर, शामकुमार गिरी, विनोद इंगळे, केतन काणेरे, महेश जाधव, जीगश्रेवरी जयस्वाल, कल्पना शेंबेकर, महिला अध्यक्षा स्वपना दिक्षीत, उल्का भरुड, सरिता सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
टिटवाळा परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद पाहता अशा रोजगाराभिमुख उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित झाली असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा मेळावा एक महत्त्वाचे पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Screenshot














Leave a Reply