प्रतिनिधी : विशाल कुरकुटे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अंबरनाथ रेल्वे स्थानकावर Railway Protection Force (RPF) च्या वतीने महिला सन्मानाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. अंबरनाथ RPF चौकीच्या प्रभारी सोनाली नंदेश्वर यांच्या पुढाकाराने महिला प्रवाशांना गुलाब पुष्प आणि मिठाई देत महिला दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दिनांक ८ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात अंबरनाथ रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. RPF च्या वतीने गुलाबाचे फूल व मिठाई देत महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF सदैव सज्ज असून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सुरक्षा उपक्रमांबाबत माहिती देत जनजागृतीही करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान विशेष उपस्थिती म्हणून जगदीश देसले व रमेश पाटील यांनी चौकी प्रभारी सोनाली नंदेश्वर यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या सत्काराचे आयोजन करण्यासाठी दीपक तेली यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी दिनेश बुचडे, संजय गुप्ता, सौ. रेखा उत्तरदे, आशा डिसोझा, कांचन कुलकर्णी तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष प्रवासी उपस्थित होते. या उपक्रमामुळे महिला सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याचा संदेश देण्यात आला असून प्रवाशांकडूनही या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
















Leave a Reply