कल्याण : कुणाल म्हात्रे
अंबरनाथ मध्ये आगरी विकास मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाची बैठक नुकतीच बैठक संपन्न झाली. या मीटिंगचे अध्यक्ष पद माजी नगराध्यक्षा कीर्ती अंदाडे यांनी स्वीकारले व प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक, कामगार नेते कॉ. काळू कोमसकर, सुरेश पाटील हे उपस्थित होते. त्यांचे स्वागत जनार्दन पाटील यांनी केले. तसेच उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर जनार्दन पाटील यांनी मंडळ स्थापनेचा हेतू स्पष्ट केला.
अनंत गवळी यांनी प्रास्ताविक भाषणात आगरी समाजाच्या मंडळाची आवश्यकता काय?तर आगरी समाज संघटित नाही सध्या परराज्यातील समाज एकवटला असून त्यांच्या शहरात विविध संघटना आहेत. अंबरनाथ शहरात कानसाई, कोजगाव, बारकुपाडा, अंबरनाथ गाव, फणसेपाडा, जाऊसई, वडोळगाव, चिखलोली, मोरिवली, जांभिवली, पालेगाव इत्यादी गावे येतात. परंतु समन्वय नसल्याने समाजाचे मंडळ स्थापनेची गरज आहे. त्या माध्यमातून आगरी विवाह मंडळ, वधूवर सुचक केंद्र, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी प्रशिक्षण केंद्र व लग्न विवाहासाठी हॉल यासाठी समाजाचे स्वतंत्र कार्यलय, हॉल असावा हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आगरी समाजाचा इतिहास सांगितला व यापुढे आगरी समाजाने राजकारणात,समाजात पुढेच रहावे व समाजातील आपापसातील भांडणे मिटवण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून व्हावा असे आवाहन केले. तर कॉ. काळू कोमस्कर यांनी मंडळ व्यवस्थित चालवण्यासाठी वारंवार कार्यक्रम घेणे व समाजाला जागृत ठेवणे हे या मंडळाचे काम आहे. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. अंबरनाथ सारख्या शहरात समाजाचे मंडळ होणे हे आपले भाग्यच आहे. समाजातील लग्नावर होणारा खर्च, रूढी, परंपरा याबाबत ठीक ठिकाणी समाजाचे प्रबोधन करावे असे सांगितले. या कार्यक्रमास समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांचे आभार आनंद गवळी यांनी व्यक्त केले.














Leave a Reply