कल्याण : कुणाल म्हात्रे
आगरी बोली भाषा साहित्य प्रचार व प्रसार तसेच तिचे जतन व्हावे यासाठी वसा घेतलेले कल्याणच्या सापाड गावातील आगरी कवी जयंत पाटील यांनी आगरी साहित्य शाळेचा व्हाटसप ग्रुप सुरू केला आहे. या समूहातील विद्यार्थ्यांची एकमेकांशी ओळख व्हावी, तसेच शाळेची एक सहल म्हणुन वेगवेगळे उपक्रम राबविण्याची अनोखी कल्पना आगरी साहित्यिक जयंत पाटील यांना सुचली त्यांनी बदलापुर जवळील कोंडेश्वर परिसरात हे उपक्रम घेतले.
रविवारी रानावनात हेलफाटा, आभ्यासिका सहल, चिखल भेट, आगरी बोली कवी संमेलन.. वृक्षारोपण या सारखे कार्यक्रम राबविण्यात आले. महादेवाचं दर्शन घेण्यात आले त्यानंतर तेथील फार्महाऊस वर आगरी कविसंमेलन, आगरी गाणी, स्नेह भोजन व मोलाचे सहकार्य करणाऱ्याचा सन्मान, सन्मानपत्र, आगरी अस्मिता विशेषांक तसेच कवी जयंत पाटील यांचा सुप्रसिद्ध आगरी बोलीतील कनगा हा काव्यसंग्रह देण्यात आला.
यावेळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, अशा सागरी जिल्हय़ातून सदस्य लांबून सहभागी झाले होते. या समूहाचे प्रशासक जयंत पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाची आखणी केली होती. अभ्यासिका सहल प्रमुख म्हणुन डॉ. शोभा पाटील, कवी संमेलन प्रमुख संदेश भोईर असे मान्यवर होते. दुर्वास धुळे यांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लागले. विकास पाटील, विनोद कोळी, जोगेंद्र जाधव, दीपेश भोईर, दिपेश साळुंके, विवेक तरे, नंदेश गावंड, तृप्ती गावंड, हरिश्चंद्र दळवी, नितुराज पाटील, राजेंद्र पाटील, सुनिल पाटील, युवराज पाटील, राजकुमार, अनिल नाईक, शशिकांत पाटील, जयेश म्हात्रे, नरेश खारीक, दिगंबर कवरे, विश्वनाथ गवळी, दिपेश पाटील यांनी सहभाग घेतला.
या आगरी साहित्य शाळेत शेकडो सदस्य सामील होत आहेत. आपणास ही सामील व्हायचे असल्यास 9421674215 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.














Leave a Reply