जिजाऊची वारी विठूरायच्या दारी या संकल्पनेखाली आषाढी वारीसाठी मोफत बस सेवा

जिजाऊ संस्थेच्यावतीने सुमारे ३500 वारकरी निघाले पंढरीला

शहापूर : अजय शेलार 

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आषाढी कार्तिकी निमित्त आषाढी वारीसाठी शहापूर ,भिवंडी, ठाणे आणि कल्याण येथील ३५०० नागरिकांच्या मोफत प्रवासाची तसेच भोजन आणि निवासाची सोय करण्यात आली आहे. 60 बस 30 लहान गाड्या घेऊन आपल्या लाडक्या विठूरायाच्या भेटीची ओढ असलेल्या वारकरी तसेच हरीभक्तांना घेऊन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने जिजाऊची वारी विठूरायच्या दारी या संकल्पनेखाली सर्व परमार्थ प्रेमी मंडळी, वारकरी संप्रदायिक मंडळी यांच्यासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आषाढी वारीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून याला नागरीकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ठाणे , भिवंडी, शहापूर , कल्याण, आसनगाव , टिटवाळा अश्या विविध भागांतून पंढरपूरसाठी जाणाऱ्या एकूण ३५०० वारकऱ्यांचा ताफा हा जिजाऊसमवेत पंढरपूरसाठी रवाना झाला आहे. त्यांच्या मोफत प्रवास ,राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केली आहे. पंढरपूर वारीसाठी आज दि. 16 रोजी वारक-र्यांना घेऊन आज पहिली फेरी रवाना झाली असून 17 व 18 जुलै रोजी देखील जिजाऊ संस्थेच्या मोफत प्रवास असलेल्या या गाड्या शहापूर येथून रवाना होणार आहेत. जिजाऊ संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात असून निलेश सांबरे यांच्या या उपक्रमामुळे आम्हांला सोयीस्कररीत्या पंढरपूर जात येणार असल्याचे यावेळी भाविकांनी सांगितले . या ताफ्यांसोबत जिजाऊ संस्थेच्या श्री. भगवान महादेव सांबरे या रुग्णालयातील ५ डॉक्टर , ४ नर्स तसेच दोन रुग्णवाहिकेची सेवा देखील पुरवण्यात आली आहे. यावेळी सर्व भाविकांची मोफत तपासणी करून त्यांना गरज भासल्यास मोफत औषधे देखील पुरवण्यात येत आहेत.

“ वारकऱ्यांची सेवा म्हणजेच साक्षात पांडूरंगाची सेवा आहे. म्हणूनच जिजाऊ संस्थेच्या वतीने मोफत बस सेवा आणि भोजन , निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मानवतेच्या दृष्टीने दिन दुबळ्यांची सेवा करण्याचे काम हे गेली १५ वर्ष आमची जिजाऊ संस्था करत आहे. त्यामुळे ही सेवा साक्षात पांडूरगा पोहचते असे मी मानतो. म्हणूनच आज विठू माऊलीच्या कृपेने पालघर सारख्या दुर्गम भागांत शिक्षण , आरोग्य , रोजगार यांची पंढरी म्हणजेच विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावातील जिजाऊ नगरी असे लोक आभिमानाने सांगतात . लोकांचा हाच विश्वास आणखी दृढ व्हावा आणि मानवतेची सेवा करण्याचे जास्तीत जास्त बळ मिळावे या हेतूने मी देखील या वर्षी पांडूरंगाच्या दर्शनाला निघालो आहे .” अश्या भावना यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी व्यक्त केल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *