विधान सभेत आपण उणीव भरुन काढु निलेश सांबरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
भिवंडी : जिजाऊ संघटनेचा भिवंडी ग्रामीण तालुक्याचा कार्यकर्ता मेळावा यशश्री लॉन अंबाडी नाका येथे संपन्न झाला . या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला . यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना निलेश सांबरे म्हणाले की निवडणुकीत मिळालेले अपयश हे मनाला लागणारे आहे . मात्र तरीही आपण कुठेही खचुन न जाता पुन्हा उभे राहिले पाहिजे . अपक्ष राहुनही आपल्याल मिळालेली मते ही लक्षणीय होती . अडिच लाखाच्या आसपास आपण पोहचलो ही देखील सोपी गोष्ट नाही असे देखील सांबरे म्हणाले.
नुकत्याच पार पडलेल्या भिवंडी मतदारसंघात जरी जिजाऊचा संघटनेच्या निलेश सांबरे यांचा पराभव झालेला असला तरी देखील एक अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचे वर्चस्व पाह्यला मिळाले राष्ट्रवादीचे विद्यामान खासदार झालेले सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे आणि माजी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना तगडे आव्हान सांबारे यांनी दिले होते. दरम्यान या निवडणुकीत अपक्ष तथा जिजाऊचे अध्यक्ष निलेश सांबरे हे तिसऱ्या क्रमांकावर होते. कुठलेली मोठे राजकीय दिग्गज व नावाजलेले पदाधिकारी हे संघटनेत नसतानाही नवख्या तरुणांना घेऊन त्यांनी आपली संघटनेची मोट बांधत केवळ सामाजिक कार्याच्या जोरावर आपले प्रस्थ निर्माण केले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत उशिरा मिळालेली निशाणी व कमी कालावधी असताना देखील सामाजिक मुद्द्यावर जिजाऊ संघटनेने मुरबाड शहापुरच्या ग्रामीण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मते घेऊन आपली ताकद वाढवली आहे. त्यामुळे निलेश सांबरे हे आगामी विधानसभा निवडणूक व जिल्हा परिषद तथा पंचायत समिती निवडणुकीच्या राजकारणातील केंद्रबिंदू होऊ शकतात असे मत राजकीय जाणकार यांनी व्यक्त केले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते सांबरे यांनी संघटनेच्या माध्यमातून निर्माण केलेली पार्श्वभूमी ही विधासाभेच्या निवडणुकांसाठी पोषक ठरणार असून अनेक ठिकाणी जिजाऊचा झेंडा फडकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांबरे पुढे म्हणाले की , अपयश हे देखील आपल्याला काही ना काही शिकवुन जाते त्याचे देखील आपण सर्वांनी आत्मपरीकक्षण करुन नवीन उभारी घेतली पाहिजे . निवडणुक हा आपला मुद्दा कधीच नव्हता आणि नसेल मात्र काही नाकर्त्या लोकांनी आपली कामे केली नसल्याने आपल्याला या राजकारणात उतरावे लागले . आपण जे उपक्रम संस्थेच्यावतीने या आधी चालवत होतो ते अधिक जोमाने चालवु राजकारणापेक्षाही समाजाला आपली जास्त गरज आहे हे समजुन कामाला लागा विधान सभेत आपण ही उणीव भरुन काढु असे सांगत ३९ विधानसभा आपण लढवणार असल्याचे यावेळी सांबरे यांनी पुन्हा एकदा जाहिर केले . तर सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांबरे म्हणाले की , आमचा पराभव झाला असला तरी पराभवाने आम्ही कुठेही खचून न जाता, आम्ही कबूल केल्याप्रमाणे जनतेसाठी २५ सी बीएससी शाळा, १०० आरोग्य केंद्र, १०० मोफत प्रशिक्षण शिबिर या महिन्यात आम्ही सुरू करणार आहोत तसेच आजही जाती धर्माच्या नावावर मत मागितली जातात आणि मतदार ही त्याला वश होतो हे देशाचे दुर्भाग्य असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच जिजाऊ संस्थेच्या आणि संघटनेच्या माध्यमातून ठाणे व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्यामुळे आपल्यावर विश्वास दाखवून भिवंडी लोकसभा मतदार संघात ज्या मतदारांनी आपल्या मतदान केले त्यांच्या प्रती सांबरेंनी ऋण व्यक्त केले. समाजासाठी मोफत रुग्णालय, मोफत मार्गदर्शन, ८ सीबीएससी शाळांमधून मोफत शिक्षण, महिला सक्षमीकरण या सर्व कामांमुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांनाही २ लाख ३० हजार मते मिळू शकली ही आमच्या केलेल्या कामाची पोचपावती आहे.
ह्या कार्यक्रमाकरिता निलेश सांबरे, मोनिका पानवे,माजी जि. प सदस्य लक्ष्मण गोष्टे, गोविंदू शेठ, महेंद्र ठाकरे, डॉ. गिरीश चौधरी इत्यादी अनेक मान्यवर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.















mumabi@24
jay jijau