टिटवाळा: जीवनदीप शैक्षणिक संस्था दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबवत असते. यावर्षी ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ९ मार्च रोजी टिटवाळा येथे महिला सन्मान मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. गोवेली रोडवरील पद्मावती रॉयल सोसायटी ते घोटसई फाटा या एक किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत ५०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. मॅरेथॉनचे उद्घाटन कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. सहभागी महिलांचे १८ ते ३० वर्षे वयोगटातील गट अ आणि ३० वर्षांवरील गट ब असे दोन गट तयार करण्यात आले होते. यावेळी सर्व सहभागी महिलांना मोफत टी-शर्ट वाटप करण्यात आले. गट अ मध्ये प्रथम क्रमांक धनश्री विलास पडवळ, द्वितीय क्रमांक संगीता एकनाथ दिघे आणि तृतीय क्रमांक वृषाली तुकाराम फसाळे आणि नमिता मनोहर गाडे यांनी पटकावला. गट ब मध्ये प्रथम क्रमांक करिष्मा धनंजय रापकर, द्वितीय क्रमांक रेश्मा दुंदाराम बनकरी आणि तृतीय क्रमांक वृषाली सचिन मानुखरे यांनी पटकावला. विजेत्या महिलांना रोख रक्कम, पैठणी साडी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेश टेंबे आणि प्रा. सतीश लकडे यांनी केले. या कार्यक्रमास जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, भाजप सरचिटणीस कल्याण चिंतामणी मगर, उपाध्यक्ष ठाणे जिल्हा राम सुरोशी, माजी सरपंच घोटसई रसिका मगर, घोटसई माजी उपसरपंच वनिता मगर, उपसरपंच घोटसई रोशनी धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य घोटसई दया मगर, घोटसई सरपंच राजू मगर, सरपंच बापसई प्रणिता टेंभे, डॉ. सुनीलदत्त गवरे, दिपालीताई बुटेरे पोई सरपंच, माजी सरपंच गोवेली सुरेखा भोईर, पोलीस उपनिरीक्षक अतुल मडके, उपसभापती बाजार समिती कल्याण प्रकाश भोईर, योगेश धुमाळ संचालक बाजार समिती कल्याण, अशोक भोईर, भगवान कोर, दीपक जाधव, राजाभाऊ चौधरी, मेसाजी भोईर, सुयोग मगर, विशाल रोहणे, आकाश सुरोशे, दिलीप बुटेरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.बी. कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.















Leave a Reply