विक्रमी सदस्यता मिळवण्याचा भाजपने व्यक्त विश्वास
टिटवाळा : भारतीय जनता पार्टीच्या वतीने सध्या देशभर संघटन पर्व सदस्यता अभियान सुरु आहे. भारतीय जनता पार्टीचे सद्स्य होण्यासाठी संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान सुरु असून मिस्ड कॉल द्या आणि भाजपा सदस्य व्हा ! अश्या पद्धतीने घोषवाक्य ठेवत मोबाईलवऋण ही सदस्य नोंदणी सुरु आहे. टिटवाळा येथे देखील हे अभियान परेश गुजरे , प्रदेश सरचिटणीस-उद्योग आघाडी यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यलयाच्या आवारात राबिण्यात आले. यावेळी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिराला मिळाला .मोठ्या संख्यने अनेक इच्छुकांनी आपली नोंदणी करत भाजपाचे सदस्यत्व घेतले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने देशभरात नवीन सदस्यांना पक्षात सामील करण्यासाठी सुरू केलेले सदस्यता अभियान मोठ्या उत्साहात राबवले जात आहे. महाराष्ट्रातही या अभियानाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून पक्षाने सदस्य संख्येत विक्रमी वाढ साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. टिटवाळा येथे देखील सदस्यता अभियानाचा उत्साह मोठ्या स्वरूपात पाह्यला मिळाला.
भाजपच्या स्थानिक नेते, कार्यकर्ते, आणि पदाधिकारी या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले आहेत. अभियान अंतर्गत विशेषत: युवक, महिला, शेतकरी, उद्योजक, आणि वंचित घटकांना भाजपच्या विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डिजिटल सदस्यता प्रणाली:
सदस्यता अभियानाला आधुनिक स्वरूप देत भाजपने डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर केला आहे. मोबाइल ऍप, वेबसाइट, आणि डिजिटल मंचांच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना घरबसल्या सदस्य होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्य उद्दिष्टे:
पक्षाचा प्रसार ग्रामीण भागात अधिक दृढ करणे, तरुण मतदारांना आकर्षित करणे, आणि महिला सबलीकरणाच्या दृष्टीने त्यांचा पक्षात सहभाग वाढवणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी स्वतः या मोहिमेत पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “सदस्यता अभियान केवळ पक्षाचा विस्तार करण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे.”
अभियानाच्या यशासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका, आणि गाव पातळीवर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत या संकल्पनेखाली विशेष कॅम्प, रॅली, आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. सदस्यता अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, विविध क्षेत्रांतील नागरिक भाजपच्या कार्यप्रणाली आणि विकासात्मक दृष्टिकोनामुळे आकर्षित होत आहेत. विशेषत: युवा वर्गाने पक्षाच्या या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला आहे.
भाजपच्या सदस्यता अभियानामुळे पक्षाच्या शक्तीमध्ये वाढ होऊन महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभियानाचा समारोप १५ जानेवारी रोजी होणार असून, त्याआधीच विक्रमी सदस्यता मिळवण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडवले आहे. या निकालांना जनतेने कळसाधारित समाजाच्या शक्तीचा प्रत्यय दिला असून, हिंदुत्वाला राजकीय आशय देणाऱ्या महायुतीतील उमेदवारांना भरघोस यश मिळाले आहे.
हिंदू समाजाने एकत्र येऊन जात, धर्म, प्रादेशिकतेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय व धार्मिक ऐक्याचा संदेश या निवडणुकीतून दिला आहे. म्हणूनच आता सदस्यता अभियानाच्या माध्यमातून आता भाजपाचा समवेत हे हिंदुत्व बळकटी घेत आता नवी उमेद जागवेल असा विश्वास परेश गुजरे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी उपमहापूर व नगरसेविका उपेक्षा भोईर, मोहाने मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर , वार्ड अध्यक्ष दीपक कांबळे, किरण गुजरे , कौस्तुभ गुजरे , भूषण बापट, साई दलाल, विजय हिंदुराव, शैलेश देशपांडे , विनोद इंगळे , अक्षय कळसकर, प्रथमेश गुजरे यांसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
















Leave a Reply