कल्याण : कुणाल म्हात्रे
तरूण पिढीचे आयुष्य वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व अनधिकृतपणे चालणाऱ्या धंद्यावर प्रतिबंध घालणे स्वागतार्हच आहे परंतु ठाणे जिल्ह्यात अजून अनधिकृतपणे डान्स बार आणि इतर चुकीचे धंदे सुरू आहेत त्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी केली आहे.
पुणे शहरातील घटनेनंतर राज्य सरकारला आलेली जाग हे जनहिताचे नक्कीच आहे. एकंदरीत सर्व अनधिकृतपणे चालणारे बार, ढाबे आणि इतर व्यावसायांवर होत असलेल्या तोडक कार्यवाही हे स्वागतार्ह आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी या अनधिकृतपणे चालणाऱ्या व्यवसायांवर होत असलेल्या कार्यवाहीच्या प्रक्रिये मध्ये कुठेतरी पक्षपात होत असल्याचे दिसून येत आहे. कारण आज पण कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या ठिकाणी बर्याचबअनधिकृतपणे चालणारे डान्स बार व ढाबे यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही असा आरोप नोवेल साळवे यांनी केला आहे.
या विषयावर फार पुर्वी दिनांक १७/१/२०२४ रोजी साळवे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अशी मागणी केली होती की कायद्याचे पालन न करता रात्री उशिरापर्यंत चालत असलेल्या डान्स बार मुळे चांगल्या घरातील मुलांची आयुष्य उध्वस्त होत असल्याकारणाने यावर निर्बंध आणले पाहिजे. रात्री उशिरापर्यंत चालत असलेले डान्स बार ऑर्केस्ट्रा बार च्या नावाखाली चालतात. मुख्यमंत्री आणि पोलीस विभागाने या गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे कारण पोलीस विभागाच्या नजरेतून होत असलेली कुठलीही चुकीची गोष्ट लपून राहणे अशक्य आहे असे मत नोवेल साळवे यांनी व्यक्त केले.














Leave a Reply