तोल जाऊन रेल्वे गाडी व फलाट गॅपमध्ये पडून कल्याण मधील 45 वर्षीय इसमाचा मृत्यू 

तोल जाऊन रेल्वे गाडी व फलाट गॅपमध्ये पडून कल्याण मधील 45 वर्षीय इसमाचा मृत्यू


डोंबिवली ( शंकर जाधव ) 
   मुंबई व उपनगरात मंगळवार 10 तारखेला मुसळधार पावसाचा परिणाम  रेल्वे वाहतुकीवर झाला.कित्येक तास वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशीवर्ग हैराण झाले होते. नवी मुंबई रेल्वे स्थानकातून  ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडीतून अफजल फकीरा शेख (४५)  प्रवास केला. ठाणे रेल्वे स्थानकात गाडी थांबल्यानंतर शेख यांनी अमरावती एक्सप्रेस गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेख यांच्या तोल गेल्याने रेल्वे फलाट व रेल्वे गाडी यातील गँपमध्ये पडले. यात जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार 8 तारखेला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात मृत्यू पावलेले अफजल  फकीरा शेख (४५) हे वास्तुविशारद होते.शेख हे सोमवारी कामानिमित्त नवी मुंबईला गेले होते.शेख यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांचा मुलगा एमपीएससीची परिक्षा देण्याची तयारी करीत आहे. एक मुलीने फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. दुसरी मुलगी इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *