दंडाबाबत रिक्षा चालकांना दिलासा

रिक्षा पांसिग विलंब नित्यरोज ५० रुपये दंडाबाबत रिक्षा चालकांना दिलासा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ शिष्टमंडळाने घेतली भेट
रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापित केल्याबद्दल कोकण विभाग महासंघाने मानले मुख्यमंत्र्यांचे  आभार
कल्याण  : कुणाल म्हात्रे 
रिक्षा पांसिग विलंब नित्यरोज ५० रुपये दंडाबाबत रिक्षा चालकांना दिलासा मिळाला असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ शिष्टमंडळाने भेट घेतली. तसेच रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापित केल्याबद्दल कोकण विभाग महासंघाने मुख्यमंत्र्यांचे  आभार मानले. या प्रसंगी कोकण विभाग महासंघ पदाधिकारी शिष्टमंडळात एकनाथ भोईर, विनायक सुर्वे, संतोष नवले, रविंद्र गायकवाड, राजु गजमल, सतिश भोसले, विलास वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रं सरकारच्या परिपञकानुसार रिक्षाचालकांना रिक्षा पांसिग विलबं नित्यरोज पन्नास रुपये दंड आकारणी आरटीओ ने सुरु केलेली आहे. विलबं दडांबाबत फेरविचार करावा याकरीता शासन दरबारी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने प्रयत्न व पाठपुरावा करण्यात  येत होता.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या निर्देशाने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ पदाधिकारी शिष्टमंडळाने आज भेट घेतली.
या भेटी दरम्यान रिक्षा पांसिग विलबं हजारो रुपये दंड भरण्यास रिक्षाचालक हतबल व असमर्थ आहेत .पांसिग विलबं दडांबाबत फेरविचार करावा अशी मागणी कोकण विभाग महासंघ पदाधिकारी शिष्टमंडळाने केली.  मुख्यमंत्र्यांनी तात्काळ परिवहन सचिव परिवहन आयुक्त यांना दंडा बाबत फेरविचार करण्याचे आदेश दिले.  परिवहन खाते सुञांच्या माहितीनुसार परिवहन आयुक्त यांचे पांसिग विलंब दंड आकारणी ७  मे २०२४ रोजी  चे जारी परिपञकानुसार ७ मे पासून रिक्षा पांसिग विलबं दंड  घेण्यात येणार आहे. एक दोन वर्ष किंवा आधिक दिवस रिक्षा पांसिग विलंब  असलेल्या रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापित केले व रिक्षा पांसिग विलंब दंडा बाबतीत लक्ष घालून दिलासा दिल्याबद्दल कोकण विभाग महासंघ पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *