मनोरंजन

मराठी चित्रपट “मुंज्या” ने  प्रेक्षांवर केले गारुड

मुंबई : सध्या सर्वत्रच मराठी चित्रपट “मुंज्या”चा गवगवा सुरु आहे.  या दमदार असलेल्या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.  प्रत्येक आठवड्यात बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या कमाईत वाढच होताना दिसत आहे.  या चित्रपटाची मुख्य कथानक भयकथेवर आधारित असून ते प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. कोकणातील एका लोककथेचा आधार घेऊन बनवलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपट गृहात गर्दी होतना पाह्यला मिळत  आहे. या  चित्रपटाने सहा दिवसांतच आपल्या चित्रपटाचे असलेले आपले बजेट वसूल केलं असून  वीकेंडला जोरदार गल्ला जमवत  चांगली कमाई केली आहे.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी ४.२१ कोटी रुपयांची कमाई ‘मुंज्या’ चित्रपटाने केली होती. तर दुसऱ्या दिवशी ८१.२५ टक्क्यांनी यात वाढ होवून ७.४० कोटींचा व्यवसाय केला. ‘सॅकनिल्क’च्या, ट्रेंड रिपोर्टनुसार, या सिनेमाने सलग तिसऱ्या दिवशी रविवारी ८.४३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. असे एकूण तीन दिवसात या ‘मुंज्या’ फ्लिमने बॉक्स ऑफिस क २०.०४ कोटी इतकी कमाई केली . चौथ्या दिवशी ३.७५ कोटी रुपयांची कमाई ‘मुंज्या’ चित्रपटाने करत पाचव्या दिवशी ४.१५ कोटी रुपये नफा कमावला . चित्रपटाच्या सहाव्या दिवशी दिवशी ३.७५ कोटी रुपयांची कमाई करत आतापर्यंतचे  ‘मुंज्या’चे ६  दिवसांचे एकूण कलेक्शन ३१.१५ कोटी रुपयांवर पोहचले आहे.

एकूण ३० कोटी रुपयांचा बजेट असलेल्या या ‘मुंज्या’ चित्रपटाने आपल्या बजेटची रक्कम प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत वसूल करत  बॉक्स ऑफिसवर ३१.१५ कोटी रुपयांचा गल्ला फक्त सहा दिवसांत जमवला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता हा सिनेमा एक वेगळाच रेकार्ड निर्माण करेल असे एकंदरीत चित्र आहे. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मुंज्या’ चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह यांच्याबरोबरच सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना “मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, असून  मराठी चित्रपटाला मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद पाहून खूप आनंद होतोय,” असे अभिनेत्री शर्वरी वाघ म्हणाली. एकंदरीत मुंज्या या चित्रपटाने प्रेक्षांवर केले गारुड केल्याचे पाह्यला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *