कल्याण : रोशन उबाळे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने २७ जून रोजी कल्याण डोंबिवली परिसरातील सात ते आठ बारवर तोडक कारवाई केली आहे. पुण्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेकायदेशीर बार, पब आणि ढाब्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर एक कारवाई करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र या कारवाईच्या विरोधात बार मालक चालक एकवटले आहेत. कल्याण ग्रामीण भागातील रुक्मिणी बारवर महापालिकेने तोडक कारवाई केली. या कारवाईनंतर बारचालक आणि बार मालकाने या कारवाईला विरोध केला आहे.
बार चालक आणि मालकांचा विरोध
यावेळी बार चालकाचे आणि मालकांचे म्हणणे आहे की, आम्ही सरकारचे विविध कर भरतो, हॉटेल इंडस्ट्रीवर शेकडो लोकांचा उदरनिर्वाह आहे. कारवाई केल्यानंतर आम्हीच नाही तर हॉटेलवर उदरनिर्वाह असणारे शेकडो लोक रस्त्यावर येतील. आम्ही डिपार्टमेंटला मॅनेज क राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना मदत करतो. शासनाच राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना मदत करतो. शासनाचे सर्व टॅक्स नियमित भरतो, मार्चमध्ये परवाना रिन्यू केलाय, आपलं सरकार म्हणून मतदान केलं आमच्या आजूबाजूला इतक्या अनधिकृत बिल्डिंग आहेत मग बारला टार्गेट का? आमच्यावर कारवाई का? असा संतप्त सवाल केला चालकांनी केला आहे. सरकारने कारवाई करण्याआ आम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
पुण्यात पब आणि हुक्का पार्लर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात शाळा कॉलेज परिसरातील अवैध रित्या सुरु असलेल्या ढाबे आणि टपऱ्या विरोधात कारवाईचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. ठिकठिकाणी कारवाई सुरु देखील झाली आहे. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. कॉलेजच्या रस्त्याजवळच्या टपऱ्यांवर जेसीबीने पाडण्याचे काम सुरु आहे. मात्र या कारवाई आधी दुकानदारांनी विरोध केला. आत्ता दुकानदारांना शिवसेना महिला जिल्हा प्रमुख छाया वाघमारे यांनी पाठींबा देत कारवाईला विरोध केला .वाघमारे यांनी पाठींबा देत कारवाईला विरोध केला आहे. या टपऱ्या अनधिकृत असल्याने महापालिकेने ही कारवाई सुरु केली आहे. मात्र छाया वाघमारे यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक वेळी कारवाई होते. तेव्हा बिर्ला कॉलेजच्या गेटवरील दुकानावर कारवाई केली जाते. हे स्टॉल्स हॉटेल ते गेल्या ३० वर्षापासून आहेत. हे विद्यार्थ्याकरीता असते त्याठिकाणी चहा पेन वही विकली जाते. या स्टॉल्सवरून अंमली पदार्थ विकले जात नाहीत. या स्टॉल्स धारकाचे पोट हातावर आहे. महापालिकेने त्यांना लायसन्स दया. त्यांना ठाणे मुंबईच्या धर्तीवर स्मार्ट स्टॉल्स द्यावेत अशी मागणी केली आहे.
केडीएमसी कारवाईच्या विरोध करणाऱ्या नेत्यांना आयुक्तांचा इशारा
या संदर्भात केडीएमसी आयुक्त जाखड यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत. या धर्तीवर कोणतेही अवेध धंदे करु द्यायचे नाहीत. त्या संदर्भातील आदेश महापालिका, पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकारी वर्गास दिले आहे. कारवाई कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही.














Leave a Reply