मोहने शहरात रोहन कोट यांच्या बॅनरची चर्चा

Whatsapp Image 2025 01 03 At 12.03.51 Pm

राजकीय वर्तुळात उदयास आला नवा तारा.

कल्याण: मोहने शहरातील राजकीय वर्तुळात सध्या रोहन कोट यांची जोरदार चर्चा सुरू आहे. रोहन कोट यांनी आपल्या ३ जानेवारी असलेल्या वाढदिवसानिमित्त मोहने शहरात प्रत्येक चौका चौकात जबरदस्त बॅनर बाजी केल्याने राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू आहे.
स्वर्गीय आनंद कोट यांच्या राजकीय वारसा लाभलेले रोहन कोट हे अल्पावधीतच यशस्वी बांधकाम व्यावसायिक आणि प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आले आहेत. नेहमी हसतमुख आणि प्रसन्न मुखाने सामोरे जाणारे कोणालाही न दुखावता प्रत्येकाला मदत करणारे म्हणून परिचित आहेत मोहने गावातील प्रत्येक कार्यक्रमात ते हिरेहिरीने भाग घेतात लहान असो वा मोठा सर्वांसोबत आनंदाने काम करतात.
कमी वयात उत्तुंग भरारी*
कमी वयातच आपल्या कामगिरीने लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या रोहन कोट यांनी बांधकाम क्षेत्रात चांगलेच स्थान निर्माण केले आहे तसेच राजकीय वर्तुळातही आपले स्थान भक्कम निर्माण केले आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांचे आशीर्वाद आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची साथ त्यांना मोठा आधार ठरत आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने त्यांचे हे राजकीय प्रदर्शन असल्याची चर्चा असली तरी रोहन कोट यांनी हे राजकीय प्रदर्शन नसल्याचे जाहीर केले असून माझ्या चाहत्यांनी हे बॅनर स्वयंस्फूर्तीने लावले असून माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले असल्याचे सांगितले आहे.

*शहरभर चर्चेत बॅनर*
रोहन कोट यांच्या नावाचे आणि कामगिरीचे बॅनर मोहने शहरात ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर झळकत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांवर आणि सार्वजनिक कार्यांवर चर्चा होत आहे. लोकांशी नाळ जोडून काम करण्याची त्यांची धडपड आणि प्रामाणिक प्रयत्न यामुळे ते राजकीय भविष्यासाठी आशादायक ठरत आहेत.
काही राजकीय मंडळी त्यांच्याकडे भावी नगरसेवक म्हणून पाहत आहे.
*राजकीय वर्तुळात नव्या तारकाची नोंद*
रोहन कोट हे फक्त आपल्या कर्तृत्वानेच नाही, तर लोकांच्या विश्वासानेही पुढे येत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे मोहने शहराचा विकास अधिक वेगाने होईल, अशी आशा स्थानिक व्यक्त करत आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांनी विराट रेसिडेन्सी येथे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून पथदिवे बसवून त्या कामाचे लोकार्पण केले होते.
अशा प्रकारे, रोहन कोट यांची राजकीय आणि सामाजिक प्रगती पाहता ते मोहने शहराच्या राजकीय नकाशावर एक नवा तारा म्हणून उदयाला आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *