राहनाळ शाळेत योगदिन उत्साहाने संपन्न

Logo2

कल्याण : कुणाल म्हात्रे

जागतिक स्तरावर योगाला विशेष असं महत्त्व आलेलं असून योगामुळे माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते. निरोगी आयुष्य जगता येते. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती विकसित होऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. असे उद्गार राहनाळ ग्रामपंचायतच्या सरपंच प्रियांका पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके केली. यावेळी राहनाळ ग्रामपंचायतच्या सरपंच प्रियांका पाटील, वरिष्ठ लिपिक प्रवीण पाटील, विश्राम नाईक, केतन माळी, आकाश पाटील, गौरव पाठारे व ग्रामपंचायर्तीचे कर्मचारी उपस्थित होते. योगाने माणसाला दैनंदिन जीवन अत्यंत सुसाह्यपणे जगता येते. २०१५ पासून योगाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. योग ही भारताने जगाला दिलेली  एक मोठे देणगी आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले.

शिक्षक अंकुश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. शिक्षिका संध्या जगताप, रसिका पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, योगाचे आणि फायदे समजावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *