शिरपूर : तालुक्यातील सुळे या परिसरात BCI प्रकल्प अंतर्गत 15 शेतकरीची निवड करण्यात आली. त्यात त्यांना 20 पेरू आणि 30 आंबे चे रोप देऊन अंतर पिक भाजीपाला लागवड साठी 1 एकर चे ठिबक संच देण्यात आले. सद्य:स्थितीत मानव जातीने केलेल्या विविध प्रकारच्या चुकांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. यामुळे उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. कधी अतिवृष्टी तर कधी बेमोसमी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. कारण निसर्गाचा समतोल ढासळत असून, निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. याचा सरळ सरळ वातावरणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करणे आणि वृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवून निसर्गाचा समतोल कसा राखता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या जाणीवेतून हा उपक्रम राबविण्यात आला, व तसेच शेतकरीना उपजिवकाचे साधन म्हणून त्यांना उत्पन्न घेता येणार आहे मग त्यात फळ बाग आणि भाजीपाला या शेतकरीना बहुपीक पद्धत्तीचे अवगत होऊन मातीची पोत ही सुधारण्यास मदत होईल.
या कार्यक्रमासाठी लुपिन संस्थाचे BCI प्रकल्प व्यवस्थापक श्री. सुनील सैंदाणे, प्रकल्प समन्वयक श्री. चंदन टोकशा आणि प्रशिक्षण समन्वयक श्री. कुशावर्त पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे या साठी सुळे पि यु चे व्यवस्थापक सूर्यकांत तावडे सर व कृषिमित्र. सुशिल इंदवे. सुरेश सोनार. चेतन पावरा. मनीषा पावरा. सर्जेराव पावरा आदीजण उपस्थित होते .














Leave a Reply