कल्याण : कुणाल म्हात्रे
यंत्रचालक व तांत्रीक तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांवरी अन्याय अमान्य असून अलीकडील बैठकीमध्ये दिलेले शब्द प्रशासनाने अंतिम बैठकीत न पाळल्याचा आरोप करत वीज कामगारांच्या वेतन वाढ करारावर सह्या करण्यास नऊ कामगार संघटनांनी नकार दिला आहे.
तीनही वीज कंपनीतील किमान 68 हजार वीज कामगारांना 1 एप्रिल 2023 पासून देय असणाऱ्या पगारवाढ करारा बाबत, किमान आठ बैठका झाल्यात, पैकी 4 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व संघटना समवेतच्या बैठकीत सूत्रधारी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकिय संचालक लोकेशचंद्र, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महा निर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक अन्बलगन व अन्य संचालक मंडळी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत प्रशासनाने कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मूळ पगारात 15 टक्के पेक्षा जास्त वाढ देऊ शक्य नसल्याचे स्पष्ट केले. मात्र अस्तित्वात असणाऱ्या भत्यांमध्ये 100 टक्के वाढ करीत असल्याचे सांगितले, या पैकी भत्यांमध्ये १०० टक्के वाढीवर सर्वांचे एकमत झाले.
मात्र प्रशासनाने महावितरणला ५२०० कोटीचा दाखविलेल्या तोटयावर भाई जगताप यांनी कडक हरकत घेत हा महावितरणला तोटा झालेला नसून तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक यांच्या चुकीमुळे अदानी पॉवर लि. ला 5666 कोटी रुपये पेन्लटी व दंड भरावा लागल्यामुळे तोटा दिसत आहे. तर तो तोटा नसून नफा आहे. या पेन्लटीला कामगार जबाबदार नाहीत. जे जबाबदार आहेत त्यांच्याकडून वसूल करा व कामगारांना द्या म्हणजे बॅलन्स शिटला आज दिसणारा तोटा तो नफा दिसेल. म्हणून ५२०० कोटी तोटा असतांना जर कंपनी 15 टक्के देऊ करीत आहे तर, पाच हजार कोटी नफा दिसल्यावर 15 अधिक 15 असे 30 टक्के वाढ कामगारांना द्या अशी मागणी माजी आमदार भाई जगताप यांनी करताच मुख्य सचिव, प्रधान ऊर्जा सचिव व चारही व्यवसथापकीय संचालक अव्वाक होऊन बघतच राहिले.
तृतीय व चतुर्थ श्रेणी तांत्रिक कामगारांना संघटनेने मूळ पगारात रु १००० वाढ मागितली होती ती मान्य झाली नाही. परंतू त्यांनी Ad-hoc भत्ता म्हणून दरमहा 1000 रु वेगळे देतो असे जाहीर केले ते संघटनेने अमान्य केले. मात्र हे हजार रुपये जर मूळ पगारात देत असेल तर आम्हाला मान्य असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. दुसरी बाब म्हणजे अन्य भत्यात 100 टक्के वाढ देतो असे मान्य केलेली मागणी काही संघटनांच्या घातकी पणामुळे आता फक्त भत्यात 25 टक्के वाढ देतो सांगून प्रशासनाने गेल्या मीटिंग मध्ये दिलेला आपला शब्द फिरवला. परिणामी संघटनेत या मुळे चीड तयार झाली.
थोडक्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांना मूळ पगारात 1000 रु वाढ न देणे, व भत्यात जाहीर केलेली 100 टक्केचा शब्द प्रशासनाने न पाळणे यामुळे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन , इंटकने शुक्रवारी बोलविलेल्या पगार वाढ करारावर सह्या न करण्याचा निर्णय घेतला व तो आजही कायम आहे. संघटने सोबत अजून नऊ संघटना आहेत. एकंदरीत नवीन पगार वाढ करार चर्चा पूर्णतः माजी आमदार भाई जगताप यांच्या खांद्यावर होती. पहिल्यापासून ते शेवटपर्येंत चर्चेचे केंद्र बिंदू भाई जगताप होते. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत जगताप यांनी वेतनवाढीची खरी प्रथम कोंडी फोडली.














Leave a Reply