उल्हासनगर | संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘संत रविदास समता पत्रकारिता पुरस्कार २०२६’ तरुण पत्रकार संदीप साळवे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उल्हासनगर येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
शहरी भागातील वंचित घटकांचे प्रश्न, सामाजिक अन्यायाविरोधात घेतलेली ठाम भूमिका आणि समतेसाठी सातत्याने केलेली निर्भीड व वस्तुनिष्ठ पत्रकारिता याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याचे संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले लेखन, सामाजिक प्रश्नांवरील प्रभावी मांडणी आणि प्रशासनाचे लक्ष वेधणाऱ्या बातम्यांमुळे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे. या सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप साळवे यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्भीड लेखणी! पत्रकार संदीप साळवे यांना ‘संत रविदास समता पत्रकारिता पुरस्कार २०२६’
















Leave a Reply