कार्ला गड एकविरा आईच्या नावाने दुमदुमला जल्लोष.

मुबंई प्रतिनीधी:(सतिश पाटील )

लोणावळा: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी, आग्री, सीकेपी, सोनार अशा विविध समाजांची कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी सोहळा चैत्र शुद्ध सप्तमीला (दि. 25) सायंकाळी 5.30 वाजता कार्ला गडावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आई माऊलीचा उदो उदो, आई आयलो च्या नामघोषाने अवघा कार्ला गड दुमदुमला होता.

पालखी मिरवणूक सोहळा शांततेमध्ये पार पडावा याकरिता श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट, पोलिस प्रशासन व तालुका प्रशासन यांनी उत्तम नियोजन केले होते. कडक पोलिस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव, ठाणेकर व पेणकर यांनी पालखीला खांदा लावत विश्वस्तांच्या उपस्थितीत आई राजा उदो… उदोचा गजर केला. या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी गडावर तुफान गर्दी केली होती. गडावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा पार पडला.मुंबई पत्रकार : श्री. सतिश विष्णू पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
आई एकविरा देवी ट्रस्ट आणि(श्री.अमर पाटील) एकविरा भक्त यांचे धन्यवाद सन्मान केल्याबद्दल. अनेक पालख्या चैत्र शुध्द सप्तमीला पायी येत असतात. आई एकविरा देवी भक्त मंडळ मुलुंड ते कार्ला अशी शिस्तबद्ध पालखी गेली 26 वर्ष अध्यक्ष :(श्री. कैलास पाटील) यांच्या नेतृत्वात आणि सर्व मुलुंड इतर 60 पेक्षा अधिक गावातील लोक मोठ्या श्रध्देने व उत्सवाने सहभाग व सहकार्य करतात यंदा साधारण 1200 पदयात्री सहभागी झाले होते.पालखी टिप:महाप्रसाद भंडारा मंगळवार दिनांक :7 एप्रिल 2026रोजी शिवगणेश मंदिर नानेपाडा मुलुंड पुर्व येथे होणार आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाचे निमंत्रण आहे. आपले नम्र :आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी दरम्यान
मुंबई पत्रकार :(सतिश पाटील )यांना चौल, आग्राव, गोवंडी तसेच मुलुंडच्या पालखीला श्रद्धेने व भक्ती भावाने खांदा देण्याचा मान मिळाला धन्यवाद आई माऊलीचा उदोउदो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *