कल्याण : रोशन उबाळे
कल्याणमधील बेतुरकर पाडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्याची मागणी शिवसेनेचे मोहन उगले यांनी केली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु केडीएमसी अधिकारी मूलभूत महत्त्वाच्या गरजा कडे त्याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही असा आरोप उगलेंनी केला. मंगळवारी (आज )उगले यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाण्याची बाटली भेट दिली. यावेळी उगलेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं. बेतुरकर पाडा परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची तत्काळ बदली करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील उगलेंना दिला.
डोंबिवलीत पाण्यासाठी नागरिकांचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव
डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरात अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिक संतप्त झालेत. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी केल्यानंतर आज महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकारी शेलार नका परिसरात आले. त्यावेळी संतप्त नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. दरम्यान आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत रहायचे का असा प्रश्न विचारला. या वेळी एका ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्याने त्यांना जवळील दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या मांडला.














Leave a Reply