आपत्कालीन परिस्थितीत प्रभाग अधिकारी व तांत्रिक विभागाने समन्वयाने काम करावे
– केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़
कल्याण : कुणाल म्हात्रे
आपत्कालीन परिस्थितीत प्रभाग अधिकारी व तांत्रिक विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी शुक्रवारी दिल्या. सध्याच्या पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत, आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक (दूरदृष्य प्रणालीद्वारे) महापालिका आयुक्तांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित अधिकारी वर्गास मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी या सूचना दिल्या. महापालिकेच्या अँप वर व टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झालेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत तक्रार निवारण समन्वयासाठी आता १ सहाय्यक आयुक्त व १ उपअभियंता मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात रात्रपाळीत उपस्थित राहणार आहेत. तसेच १ उपआयुक्त व १ कार्यकारी अभियंता यावर नियंत्रण करणार आहेत. प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या पथकासह दक्षता घेवून कार्यवाही करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे यांनी या बैठकीत दिल्या. तसेच प्रत्येक प्रभाग कार्यालयात व्हिहिंग सेंन्टर मध्ये इनिटिग्रेडट कंमाड अँन्ड कंन्टोल सेंटर मार्फत एखादा अलर्ट प्राप्त झाल्यावर तातडीने त्याच्यावर कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे पुर परिस्थितीत एसकेडीसीएलने बसविलेल्या फ्लड सेंन्सरकडे लक्ष देवून आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
प्रभागातील आपत्कालीन व्यवस्थापन हे परिमंडळ उपायुक्तांच्या देखरेख व नियंत्रणाखाली होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकता पडल्यास परिमंडळातील आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भविल्यास नागरीकांनी सूचना देण्यासाठी रिक्षा वाहनांवर साऊंड सिस्टिम बसवून त्या परिसरात फिरविण्यात याव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त – २ तथा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे नोडल आँफिसर धैर्यशील जाधव यांनी प्रभाग अधिका-यांना दिले.














Leave a Reply