नाशिक : यश मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड-2 हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खत शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे विकसित करण्यात आलेल्या या उत्पादनाचे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत करत पिकांची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने हे खत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यश मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड-2 चे लोकार्पण
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते या उत्पादनाचे लोकार्पण झाले. प्रमुख अतिथी म्हणून डीआरडीओचे शास्त्रज्ञ राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. संजीवनी महाले, डॉ. जयदीप निकम, डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. नितीन ठोके आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरूंनी सांगितले की, विद्यापीठाच्या संशोधनाचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. शास्त्रज्ञ राजेंद्र पाटील यांनी या उत्पादन प्रक्रियेचे कौतुक केले.
काय आहे यश मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड-2?
आधुनिक शेतीत नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो; मात्र जमिनीत लोह, मँगनीज, झिंक, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. ही उणीव भरून काढण्यासाठी यश मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड-2 तयार करण्यात आले आहे.
हे द्रवरूप खत फवारणीद्वारे देण्यात येते. यामुळे पिकांतील हरितद्रव्य, संजीवके आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते, फुलधारणा व फळधारणा सुधारते आणि उत्पादनात वाढ होते.
शेतकऱ्यांसाठी किफायतशीर दरात उपलब्ध
या उत्पादनाची गुणवत्ता अत्याधुनिक AAS मशीनद्वारे तपासली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून कृषीदुत गट कृषी महविद्यालय सरळगाव यांकडून इंदे गावी कृषी दिन साजरा विक्रीसाठी परवाना मिळाल्यानंतर हे खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. बाजारभावापेक्षा कमी म्हणजेच २५० रुपये प्रति लिटर दराने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकांच्या वाढीवर थेट परिणाम होतो. यामुळे उत्पादन घटते आणि गुणवत्ता कमी होते. यश मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड-2 च्या नियमित वापरामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या उत्पादनाचा योग्य वापर कसा करावा, डोस किती असावा आणि कोणत्या पिकांसाठी ते उपयुक्त आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.














Leave a Reply